मराठी भाषा अनेक साज शृंगाराने नटलेली आहे ; शाहीर दिलीप सावंत

 मराठी भाषा अनेक साज शृंगाराने नटलेली आहे ; शाहीर दिलीप सावंत



शहीद महाविद्यालयात मराठी  भाषा गौरव दिन उत्साहात

कोल्हापूर (तिटवे ) २८ सिटी न्यूज नेटवर्क 

येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयत मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला.प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी  भाषा गौरव दिन' होय.अनेक साज शृंगार करून नटलेली मराठी भाषा आहे असे मत शाहीर दिलीप सावंत यांनी  व्यक्त केले.ते पुढे म्हणाले भाषा दर दहा कोसांवर बदलते असे मानतात.काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे  बदलतात.तसतशी जुनी  मराठी भाषा कालबाह्य होते आणि  आता मोबाईलच्या  जमान्यात आवाज हरपला आहे. तशी भाषाही हरपली आहे .

        यावेळी पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी मराठी राज्यभाषा संवर्धनाविषयी  प्रश्नमंजुषा घेतली व विजेत्या विद्यार्थिनींना पुस्तक भेट देण्यात आली.


कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी केले. प्रा.दिग्विजय कुंभार,  यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले. सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी केले तर आभार प्रा.  शुभांगी भादिंगरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य सागर शेटगे, ग्रंथपाल संग्राम किल्लेदार शिक्षकवृंद विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

Comments