अब की बार 45 पार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापुरातून मुख्यमंत्र्यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले
गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांची रेकॉर्ड ब्रेक सभा
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापुरात शिवसेनेचे महाअधिवेशन गेली दोन दिवस सुरू होते . त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात होती .
निवडणुका आल्यावर विरोधकांना हिंदुत्वाची पुन्हा आठवण झाली आहे.आता यांना राम आठवला,आधी म्हणायचे मंदिर बनायेंगे परत तारीख नही बतायेंगे.पण देशाचे पंतप्रधान मोदीजींनी मंदिर सुद्धा बांधलं आणि तारीख सुद्धा सांगितली असे सांगून उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत घणाघात केला. कोल्हापूरच्या गांधी मैदानात मुख्यमंत्र्यांची रेकॉर्ड ब्रेक सभा झाली
आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले,याच गांधी मैदानात यापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची सभा झाली होती.त्यानंतर एवढी मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा पहिल्यांदाच होत आहे.मैदान हाऊसफुल्ल झालं म्हणून बाहेर रस्त्यावर लोक उभारले आहेत.शिवसेनेला साजेसं आयोजन झालंय.कोल्हापूर भगवं झालंय त्यामुळे ही सभाच सांगते शिवसेना कोणाची आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले,दीड वर्षांपूर्वी आपण पाहिले कि राज्यात एक उठाव आणि क्रांती झाली.50 आमदार माझ्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले.आमचं सरकार आल्यावर सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचं सांगून शेतकरी, वारकरी, धारकरी समाधानी झाला पाहिजे म्हणून अहोरात्र आपण काम करत असल्याचं त्यांनी सांगितले.त्यामुळे आता शिवसेना कोणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहीली नाही तुमच्यामुळे सगळ्यांना कळलं आहे.कोल्हापुरात शॉवसेनेचे दोन दिवसाचे महा अधिवेशन पार पडले.लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे ठराव मांडले आणि ते अमलात पण आणण्याचे ठरवले
--मी काल अंबाबाई चे दर्शन घेतले... मी कधी काही मागितले नाही... फक्त माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवू देत.माझा शेतकरी, बळीराजा सुखात राहू दे असं साकडं अंबाबाई ला घातलं.असं सांगून मी फक्त या सभेला नाही आलो, या आधी कोल्हापुरला महापूर आला तेव्हा आलो होतो.दहा-बारा दिवस मी कोल्हापूर मध्ये होतो.पावसाचे पाणी दोन दोन मजले वर गेले होते.मला रात्री एक वाजता फोन आला,एक गर्भावती महिलेला तेव्हा रात्री मदत लागली,ती अडली होती,तेव्हा एन डी आर एफ ला सांगितले की तिला मदत केली पाहिजे.एन डी आर एफ चे अधिकारी म्हणाले रात्री रेस्क्यू करता येणार नाही.मग तुम्ही येत नसेल तर मी निघालो असं सांगून मी निघालो आणि मागून एनडीआरएफ सुद्धा आली.आणि तिला आम्ही मदत केली. तर काहींनी आपल्या गुराढोरांसह आपल्या कुटुंबाला पाण्यातून बाहेर नेले होते.हा किस्सा सांगून मुख्यमंत्री म्हणाले,आणि दुसरीकडे मुंबईतमध्ये 26 जुलैचा पूर आला होता,मुंबई पाण्याखाली गेली होती, अशातच मातोश्री वर बाळासाहेबांना एकटं सोडून सोडून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे आणि गुराढोरांसह पुराशी दोन हात करणारे कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले,आता मुख्यमंत्री म्हणून राज्यभर फिरताना लोकांच्या मनातला विश्वास आणि प्रेम पाहतोय.बाळासाहेब सांगायचे 80 टक्के समाजकारण करा आणि 20 टक्के राजकारण करा.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय.ते म्हणायचे मंत्रालयात न बसता रस्त्यावर लोकांसाठी उतरा.आता त्यांच्या विचारांना बेईमानी केली त्यांना कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे.
बाळासाहेब यांचा वारसा सांगायला तोंडात नाही तर मनगटात बळ असावं लागतं.बाळासाहेब म्हणजे विचार बाळासाहेब म्हणजे हिंदुत्वाचा धगधगता अंगार होते. बाळासाहेब असेपर्यंत मातोश्री हे मंदिर होतं.माझे वडील चोरले असे म्हणतात पण बाळासाहेब चोरायला बाळासाहेब म्हणजे काय वस्तू होते का??असा सवाल करून जर आम्ही चुकीचे पाऊल उचलले असते तर हे मैदान आज भरलं असत का ? असं ते म्हणाले.
जसे मुघलांच्या घोड्याना सुद्धा पाणी पिताना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसें यांना सतत फक्त एकनाथ शिंदे दिसतो.सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?यांना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत.मी आज या व्यासपीठावरून सांगतो भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री म्हणून भाषण करायला लागला तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल.असं एकनाथ शिंदे म्हणाले
आमच्या सरकारने महिलांना एसटी मध्ये 50 टक्के सवलत दिली,जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाला 6 हजार रुपये देतात तसें आम्ही सुद्धा देतो.महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरण धोरण आम्ही आणतो आहोत.1 रुपयात पीक विमा देण्याचं काम आम्ही केलंय, हे निर्णय होत आहेत म्हणून लोक आमच्यासोबत येत आहेत.घरून फेसबुक लाईव्ह आपलं काम नाही आपण फिल्ड वर उतरतो.शेतकऱ्यांच्या बांधावर जातो ,लोकांना भेटतो मात्र दुसरीकडे रोज सकाळी उठून जे एकच जप करत बसतात खोके खोके करत बसतात.
जेव्हा शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाले तेव्हा त्यांनी पत्र लिहून कळवले कि 50 कोटी द्या.मी तात्काळ दिले... त्यांना बाळासाहेब नको त्यांना 50 कोटी रुपये हवेत.मात्र आमच्याकडे धनुष्यबाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार आहेत.जेव्हां एखादा शिवसैनिक अडचणीत असेल असेल तेव्हा त्याला सांगायचं की तू तुझं बघ म्हणून सांगणाऱ्यांना बाळासाहेब नकोत असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पक्षाच्या प्रमुख नेत्याने अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असतं.तेव्हा पक्ष मोठा होतो. शिवसेना वाचावे धनुष्यबाण वाचावी म्हणून आम्ही बंड करण्याचा हा निर्णय घेतला.
आणि तो निर्णय आज लोकांनी मान्य केला. म्हणून हजारो लाखो लोक सोबत येत आहेत.लोकांना काम पाहिजे.यांचे ज्योतिषी थकले ते रोज ज्योतिषाचा पाढा वाचायचे... सरकार आज पडणार उद्या पडणार परवा पडणार.पण सरकार काही पडले नाही.आज इंडिया आघाडी केली पण त्यांना प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आपण ठरवू शकला नाहीत.
कुणाच्या जोरावर तुम्ही मोदीजींना आव्हान देत आहात असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला.
देशाचा विकास होत असताना कुणाला तरी प्रधान मंत्री होण्याचं स्वप्न पडत आहे... कोणालातरी अर्थमंत्री व्हायची स्वप्न पडत आहेत. सगळी हास्य जत्रा सुरू आहे.
काल पर्वा यांनी स्वतःला काय म्हटलं हेही सुद्धा आपण पाहिलं.मुख्यमंत्री म्हणायचे होते पण त्याऐवजी मूर्ख असं काहीतरी ते बोलून गेल्याचं शिंदे यांनी सांगितले.
आता लोकसभा निवडणुका समोर आहेत.अबकी बार चारसो पार असा नारा मोदीजींनी दिला आहे.आणि आपला नारा आहे की अब की बार 45 पार.
कोल्हापूर ला भरघोस निधी दिलाय आणखी देणार
कोल्हापूर जिल्ह्यातील विकासासाठी आमच्या सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय,
आज जवळपास 640 कोटींचे उद्घाटन करून आलो असं सांगून आत्ता पर्यंत पंचगंगा प्रदूषण शून्यावर आणण्यासाठी जवळपास 400 कोटी रुपये आपण शासनाकडून मंजूर केले.पंचगंगेला येणारा महापूर थांबवण्यासाठी आपण काम करतोय. कोल्हापूरकरांचा टोल मी हटवून दाखवला असं त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण बाबत बोलताना ते म्हणाले,मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण हे सरकार देणार आहे.त्यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलवलं आहे.इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही.
कोल्हापूर ला सात एमआयडीसी मंजूर
कोल्हापुरात आपण सात एमआयडीसी प्रकल्प मंजूर केले आहेत.असे सांगून कोल्हापूर मध्ये मोठे उद्योग आले पाहिजेत,इथला माणूस मुंबई पुण्यात नोकरीसाठी जाता कामा नये.पन्हाळा शाहू डोंगरी वाडीला सुद्धा याचा लाभ होईल.त्याच बरोबर या ठिकाणी गिरणी कामगारांना घर देण्याची कामे सुरू झाली आहेत.राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीवर दहा कोटी रुपये आपण दिले.जेव्हा एका विचाराचे सरकार असते तेव्हा अशी कामे करता येतात.
कोल्हापूरच्या आराखड्याचा देखील प्रश्न अजून प्रलंबित आहे पण तो सुद्धा आपण सोडवणार.असल्याचं सांगत देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींचे हात आपण बळकट करूया.त्यासाठी
शिवसेना मजबूत करावी लागेल.आपला निर्धार आहे की नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा.आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा.केंद्राने केलेले काम आणि राज्य सरकारने केलेले काम आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत.मग लोकं काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील.घरी बसणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत.काही लोकांना नेहमीच पोटदुखी असते.मी काहीही केलं तरी त्यांना प्रॉब्लेम असतो.पण आमचं डबल इंजिनचं सरकार आहे.राज्याच्या प्रगती चा आम्ही निर्धार केलाय.माझ्या रक्ताचा एक एक थेंब लोकांच्या सेवेसाठी उपयोगी असेल असा आशावाद सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

Comments
Post a Comment