चंदीगड विजयाबद्दल आप कडून साखर वाटून जल्लोष
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
चंदीगड येथील महापौर निवडणुकीत झालेली मतमोजणी अवैध ठरवत सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला विजयी घोषित करून ऐतिहासिक निकाल दिला. या विजयाबद्दल आप ने छ. शिवाजी चौक येथे जमून साखर वाटप करत जल्लोष केला. भारतीय लोकशाहीचा विजय असो, लोकशाही जिंदाबादच्या घोषणा आप कार्यकर्त्यांनी लगावल्या.
निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेवर खाडाखोड करून आप ची आठ मते बाद करण्याचा केविलवाणा प्रयत्न महापौर निवडणुकीत केला. या निवडणूक अधिकाऱ्याचा भाजपशी संबंध असल्याचे समोर आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने भाजपचा डाव हाणून पाडला गेला. हा आम्ही लोकशाहीचा मोठा विजय मानून साखर वाटत असल्याचे आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, रवी राऊत, मयुर भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, डॉ. कुमाजी पाटील, रमेश कोळी, अमरसिंह दळवी, आदम शेख, चेतन चौगुले, सुनीता साळोखे, नाझील शेख, अजिंक्य जाधव, राजेश खांडके, उमेश वडर, जावेद पठाण, रोहन राजशिर्के आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment