शहीद महाविद्यालतर्फे रक्तदान व डोळे तपासणी शिबिर, श्रमदानातून तलावाची स्वच्छता
कोल्हापूर (बिद्री) २१ सिटी न्यूज नेटवर्क
शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालतर्फे सोनाळी (ता. कागल) येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर सुरु आहे. या निमित्ताने सोनाळी गावामध्ये रक्तदान व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोनाळी परिसरातील रक्तदात्यांनी या वेळी रक्तदान केले. तसेच शंभरहून अधिक व्यक्तींची डोळे तपासणी करण्यात आली.
सोनाळी गावातील तलाव परिसरामध्ये स्वछता करण्यात आली. गेले अनेक दिवस प्रलंबीत असणारे हे काम महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या माध्यमातून पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे आभार मानले.
स्त्रियांच्या आयुष्यात काही नेमके बदल होत असतात – मासिक पाळीची सुरुवात, गर्भारपण, प्रसूती आणि मासिक पाळी बंद होणे. या टप्प्यांवर काही स्त्रियांना विशिष्ट मानसिक आजार होतात. त्यांना ‘स्त्रियांमधील मानसिक आजार’ असे म्हटले जाते. या टप्प्यांवर स्त्रियांना लहान कालावधीत मोठे शारीरिक, मानसिक व सामाजिक बदल स्वीकारावे लागतात,असे मत डॉ. प्रिया दडगे यांनी यावेळी आयोजित व्याख्यानात केले.
यावेळी वैभवलक्ष्मी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी कोळी व सहकारी, वालावलकर हॉस्पिटलचे डॉ. वनकुंद्रे व सहकारी, सोनाळी गावचे सरपंच तानाजी कांबळे, उपसरपंच धनाजी पोवार, सदस्य समाधान म्हातुगडे, सुरेश पाटील,आकाराम बाचाटे, ,उपप्राचार्य सागर शेटगे, प्रा. दिग्विजय कुंभार उपस्थित होते. ह्या संपुर्ण कार्यक्रमांचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर व प्रा. वैभव कुंभार यांनी केले.
Comments
Post a Comment