दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४. 






पौष कृष्ण एकादशी. हेमंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 


"आज चांगला दिवस आहे"  *षटतिला एकादशी* घबाड सकाळी ७.३५ नंतर.


नक्षत्र - जेष्ठ/मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक/धनु.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू आणि शनीशी शुभ योग् होतो आहे. लक्ष्मी प्रसन्न होईल. अडलेली सर्व कामे पूर्ण होतील. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) काहीसा संमिश्र दिवस असला तरी कामे वेळेत पूर्ण होतील. नोकरीत काही सकारात्मक अनुभव येतील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अतिशय उत्तम दिवस आहे. संधीचे सोने करा. जीवनाचा आनंद घ्याल. कामेमार्गी लागतिल. 

 

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. अर्थलाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्साह वाढवणारा दिवस आहे. प्रेमात यश लाभेल. शेअर्स मधून लाभ होतील. धार्मिक यात्रा घडतील.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र कालावधी आहे. स्थावर संपत्तीत वाढ होईल. व्यावसायिकांना यश मिळेल. 

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. आयुष्याला वेगळे वळण देणारा दिवस आहे.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) सौख्याचा दिवस आहे. नात्यातून विशेष लाभ होतील. जुने मित्र भेटतील. नवीन पदवी मिळेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. गुरुशी लाभ योग आहे. उत्तम कालावधी आहे. अचानक लाभ होतील. शेअर्स मधून यश मिळेल.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. वास्तू संबंधित कामे पूर्ण होतील. बगीचाशी संबंध येईल. 


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अत्यंत अनुकूल दिवस आहे. दीर्घकालीन फायदा करणाच्या घटना घडतील. प्रवास कार्यसाधक होतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नोकरी/व्यवसायात प्रगती होईल. सुखाचे क्षण अनुभवाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments