दैनिक राशिभविष्य
मंगळवार, २० फेब्रुवारी २०२४.
माघ शुक्ल एकादशी/द्वादशी. शशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे" *जया एकादशी* घबाड दुपारी १२.१३ नंतर. सूर्याचा शततारका प्रवेश.
नक्षत्र - आर्द्रा/पुनर्वसू. आज जन्मलेल्या बाळाची राशी -मिथुन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्या राशीतील हर्षलशी चंद्राचा लाभ योग आहे. अचानक धनलाभ होईल. आर्थिक बाजू भक्कम होईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कुटुंबासाठी खर्च कराल. दिवसाचा उत्तराध धार्मिक आचरण करायला लावणारा आहे. धनवृद्धी होईल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यन्त उत्तम दिवस आहे. अचानक मोठे घबाड हाती लागेल. व्यापारात यश.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) वरिष्ठ साठी खर्च करावा लागेल. नोकरीत चांगला अनुभव येईल. सहकार्य लाभेल. उत्तराध शुभ कार्याचा आहे.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल दिवस आहे. विज्ञानातून यश लाभेल. राजकृपेचा अनुभव येईल. उच्च शिक्षणात यश.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यावसायिक तणाव कमी होईल. नोकरीतील चिंता दूर होतील. वितुष्ट मिटेल. पत्नीकडून लाभ होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) कोर्ट कामात यश मिळेल. वाद मिटल्याने शत्रूकडूनच लाभ होतील. खरेदी -विक्री व्यवसायात उत्तम यश मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) फारशी अनुकूलता नसली तरी प्रगती होत राहणार आहे. मात्र दगदग वाढेल. विनाकारण प्रवास घडेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अचानक लाभ होतील. शेअर्स मध्ये नशीब अजमावून बघण्यास हरकत नाही. प्रतिस्पर्धी गारद होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) सुपीक जमिनीचे व्यवहार होतील. शेतीत वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. स्थानात बदल घडेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) पराक्रम गाजवण्याचा दिवस आहे. आधी राहू आणि नंतर गुरूच्या नक्षत्रातील चंद्र कष्ट अन त्याचे फळ देईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धन धान्य यात वाढ होईल. वास्तूचे प्रश्न मिटतील. सोने खरेदी होईल. भूमिगत द्रव्ये यातून लाभ होतील.
Comments
Post a Comment