"मनसे" कोल्हापूरची नूतन कार्यकारणी शिस्तबद्धपणे पक्षाचे काम करणार - बाळा शेडगे

 "मनसे" कोल्हापूरची नूतन कार्यकारणी शिस्तबद्धपणे पक्षाचे काम करणार  - बाळा शेडगे


कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क 

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा कोल्हापूर लोकसभेचे संघटक तथा प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

      कोल्हापूर प्रेस क्लब मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसे पत्रकार परिषदेमध्ये पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी बोलताना मा.बाळा शेडगे यांनी कोल्हापूर मध्ये पक्ष बांधणीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असून कोल्हापूर लोकसभेसाठी जोमाने तयारी करीत आहोत. सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षशिस्तीची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सर्व अंगीकृत संघटनांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना विचारले शिवाय कोणतेही आंदोलने अथवा निवेदन करता येणार नाहीत असे स्पष्टपणे नमूद केले.

         याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर उत्तर विधानसभा, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील करवीर विधानसभा मतदारसंघातील तालुका अध्यक्ष, उपतालुका अध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, पदाच्या नियुकत्या करून अंगीकृत संघटना, फादर बॉडी याची कामे पक्ष शिस्त , आंदोलने प्रोटोकॅाल या विषयी मार्गदर्शन केले.

       मनसे पत्रकार परिषदेस सहसंघटक अच्युतराव मोळावडे, अरुण येवले , शिवाजी मते , जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले , शहर अध्यक्ष प्रसाद पाटील , जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा , तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील,  इ. मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments