अन.. क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला
कोल्हापूर दि. १६ सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राष्ट्रीय महा अधिवेशनाची कोल्हापूर येथे मोठ्या थाटात सुरवात करण्यात आली. या अधिवेशनाशी जय्यत तयारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. महासैनिक दरबार हॉल मैदानावर प्रशस्त मंडपात या अधिवेशाची सुरवात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आयोजकांकडून अनावधानाने राहिल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या लक्षात येताच त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो तात्काळ उपलब्ध करून स्टेजवर आदराने पूजन केले.

Comments
Post a Comment