उद्यापासून सुरू होणार के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषकाचा थरार, खंडोबा तालीम आणि कृष्णराज महाडिक यांच्याकडून आयोजन, फुटबॉल संघांवर होणार लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते 20 फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी 4 वाजता स्पर्धेचा शुभारंभ होणार असून, 3 मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील विजेते संघाला 2 लाख रुपये, उप विजेत्या संघाला 1 लाख, तृतीय विजेत्याला 50 तर चतूर्य विजेत्याच्या संघाला 25 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. कौशल्यपूर्ण खेळाचं प्रदर्शन घडवणार्या खेळाडूंना लाखो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम फुटबॉल संघाचे अध्यक्ष युवराज बचाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा, तसेच येणार्या काळात देशभरातील लिंग सामने खेळण्यासाठी कोल्हापूरची टीम तयार करावी, या उद्देशाने खंडोबा तालीम आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेबाबत माहिती देताना कृष्णराज महाडिक म्हणाले, कोल्हापुरात दर्जेदार फुटबॉल खेळाडू आहेत, पण त्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन मिळत नाही, चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन कोल्हापूर शहराची टीम तयार करण्यासाठी के. एम. चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून, 20 फेब्रुवारीला स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 18 संघ सहभागी होणार आहेत. बाद फेरी आणि लिग पद्धतीने होणार्या स्पर्धेतील विजेत्या संघाला 2 लाख, उपविजेत्या संघाला 1 लाख रुपये, तृतीय विजेत्याला 50 तर चतुर्थ विजेत्याच्या संघाला 25 हजार रुपयांची बक्षिसे आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे. त्याशिवाय स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट प्लेअर यांनाही आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेतून कोल्हापुरातील चांगले खेळाडू समोर येतील, असा विश्वास कृष्णराज महाडिकयांनी व्यक्त केला, बाद फेरीदरम्यान रोज दोन सामने होणार आहेत, तर लिग सामने रोज एक होतील 3 मार्चला अंतिम सामना होणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खंडोबा फुटबॉल संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पोवार, आशिष जरग, संकेत सुर्यवंशी, अजिंक्य जाधव, आशिष बराले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment