उत्तराखंड प्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन येत्या काळात आक्रमक होणार : प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे


उत्तराखंड प्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन येत्या काळात आक्रमक होणार  : प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 


 हिंदवी स्वराज्य हिंदू एकता मुख्य कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू एकताच्या सर्व जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन  शिंदे म्हणाले की 1980 सालापासून देशात समान नागरी कायदा लागू करा या मागणीसाठी निवेदन दीली आंदोलन केली मोर्चेही काढण्यात आली ही मागणी गेल्या 1980 सालापासून हिंदू एकता आंदोलन करत आहे परंतु उत्तराखंड  सरकारने कायदा केला त्याच धर्तीवर महाराष्ट्रातल्या सरकारने सुद्धा हा कायदा करावा या मागणीसाठी येत्या काळात हिंदू एकता आंदोलन आक्रमक होणार संघटना वाढीसाठी नव्याने पदांची नियुक्ती करण्याच्या सूचना मा.आमदार नितीन शिंदे यांनी दिल्या                                 पूर्वीचे आक्रमकता व दरारा निर्माण करण्याची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली..



  कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हिंदू एकता च्या पदाधिकारी नेमणुका लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती श्री दिपक देसाई यांनी दिली.. या बैठकीत अध्यक्ष स्थानी हिंदू एकता आंदोलन प्रदेश कार्याध्यक्ष विनायक अण्णा पावसकर होते

यावेळी स्वागत व प्रस्तावना श्री गणेश नारायणकर यांनी केली

हिंदू एकता आंदोलन मिरज ज्येष्ठ सदस्य श्री.दत्तात्रय भोकरे  कराड ज्येष्ठ सदस्य श्री.चंद्रकांत जिरंगे यांचे भाषणे झाले याप्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री.संजय जाधव शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजू जाधव मिरज शहराध्यक्ष श्री.सोमनाथ गोठखिंडे कराड शहराध्यक्ष श्री.प्रकाश जाधव सांगलवाडी विभाग प्रमुख श्री.अनिरुद्ध कुंभार चंद्रकांत बराले , श्री दीपक देसाई, गजानन तोडकर, हिंदुराव शेळके , दिलीप सुर्यवंशी प्रकाश आयरेकर संजय साडविलकर हे उपस्थित

Comments