आसमा चषक क्रिकेट स्पर्धेला रोमहर्षक प्रारंभ
सकाळ, मिडीया इलेव्हन, आसमा व लोकमत संघ विजयी
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
ऍड एजन्सीज अँड मिडिया असोसिएशन (आसमा) व कोल्हापुरातील विविध वर्तमानपत्र, रेडिओ चॅनेल, टीव्ही चॅनेल यांच्या 'आसमा चषक' क्रिकेट स्पर्धा अत्यंत रोमहर्षक वातावरणात सुरू झाल्या. शास्त्रीनगर येथील मैदानावर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते व फेमचे अध्यक्ष महेश कराडकर, माजी नगरसेवक काका पाटील, साई सर्व्हिसचे सुधर्म वाझे, कोल्हापूर जिल्हा मुद्रण संघाचे अध्यक्ष संजय थोरवत, दै. पुढारीचे व्यवस्थापक राजेंद्र मांडवकर, दै. लोकमतचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व प्रसारमाध्यमातील विविध प्रतिनिधिंच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला. पुढारी, लोकमत, सकाळ, तरुण भारत, पुण्यनगरी, मिडिया इलेव्हन व आसमा कोल्हापूर व सांगली संघानी सहभाग घेतला आहे. आसमाचे अध्यक्ष सुनील बासरानी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन अमरदीप पाटील यांनी प्रास्ताविक करुन स्पर्धा आयोजनामागील हेतू सांगितला. '७५ नॉट आउट' या थीम खाली होणाऱ्या या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होत आहेत. आज झालेल्या स्पर्धेत सकाळ, मिडिया इलेव्हन, आसमा कोल्हापूर, लोकमत आणि आसमा सांगली यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवला. उद्या रविवार दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी सहा स्पर्धा होणार असून सायंकाळी फायनल मॅच होईल. संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होईल. उदघाट्न समारंभास आसमाचे उपाध्यक्ष पी.एस. कुलकर्णी, सचिव संजीव चिपळूणकर, खजानीस राजाराम शिंदे, इव्हेंट सेक्रेटरी अतुल उपळेकर, मनीष राजगोळकर, सुहास लुकतुके, अभय मिराशी, संजय रणदिवे, प्रशांत बुचडे, सुनील बनगे, कौस्तुभ नाबर, सुधीर शिरोडकर, उदय जोशी, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह प्रसारमाध्यमांचे विविध प्रतिनिधी व आसमाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
https://youtu.be/vgdIZeoIfD8?si=cwm7-vfshnYEzhGO
Comments
Post a Comment