आजपासून दहावीची परीक्षा सुरू

 आजपासून दहावीची परीक्षा सुरू 



कोल्हापूर १ सिटी न्यूज नेटवर्क

विद्यार्थी जीवनातील पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी परीक्षा . आजपासून कोल्हापूर बोर्डाची परीक्षा सुरू झाली असून त्यामध्ये मुलाच्या उत्साह बरोबर पालक आणि शिक्षक वर्गाचा ही जाणवत होता. कोल्हापूर नजिक असलेल्या भारती विद्यापीठाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन दहावीच्या विद्यार्थी यांचा स्वागत करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असणाऱ्या पालकांनी या प्रसंगाचे कौतुक केले. विद्यार्थी वर्गाचा परीक्षेबाबत असणारा  तणाव दूर व्हावा हीच अपेक्षा असल्याचे मत मुख्याध्यापक रावसाहेब पाटील यांनी इ सिटी न्यूज नेटवर्क चे अविनाश काटे यांच्याशी केले

Comments