दैनिक राशिभविष्य

दैनिक राशिभविष्य 

 रविवार, १० मार्च २०२४. 





माघ अमावस्या. शिशिर ऋतू.  शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज वर्ज्य दिवस आहे" *दर्श अमावस्या*  


चंद्रनक्षत्र - पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ/मीन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक लाभाचे योग आहेत. अनुकूल ग्रहमान आहे. नेहमीपेक्षा वेगळा विचार कराल.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मनासारखी कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. नोकरीत अचानक एखादे काम सामोरे येऊ शकते.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अत्यन्त उत्तम ग्रहमान आहे. लाभदायक दिवस आहे. संधीचे सोने करा. व्यस्त रहा.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) कामाचा ताण वाढेल. मात्र त्यातून लाभ होतील. रसायने आणि अग्नी संबंधित व्यापारात यश लाभेल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) जेष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. परदेशी व्यापारातून यश मिळेल. जोडीदाराशी विनाकारण वाद वाढवू नका.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. चालढकल नको. वाहन जपून चालवावे.

 

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचमस्थानी रवी चंद्र युती आहे. भलते धाडस नको. काव्य, शास्त्र यांचा आनंद घ्याल. 

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नोकरीतील एखादे छोटेसे प्रकरण मोठे होऊ शकते. काळजी घ्या. मन शांत ठेवा. आरोग्य सांभाळा.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अति साहस नको प्रवास टाळणे. प्रवास टाळणे हिताचे आहे. संतती कडून चांगले अनुभव येतील.

 

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) धनधान्य वाढेल. मनासारखी कामे होतील. बाग बगीचा मध्ये फिरताना काळजी घ्या. सरकारी कामात दिरंगाई नको. 

 

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)  मेजवानी मिळण्याचा दिवस आहे. अधिकार वाढतील मात्र त्याचा गैरवापर नको. अहंकार टाळल्यास आज उत्तम कामे होतील.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लवकरच परिस्थिती बदलेल. अडचणी दूर होतील. संयम ठेवावा लागेल. सरकारी कामात लक्ष घालावे लागेल. 


(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments