दैनिक राशिभविष्य
बुधवार, १३ मार्च २०२४
. फाल्गुन शुक्ल चतुर्थी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
"आज दुपारी ०३.०० पर्यंत चांगला दिवस आहे" *विनायकी चतुर्थी*
नक्षत्र - भरणी/कृतिका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमच्याच राशीत चंद्र गुरू युती आहे. अनुकूल शुक्र, शनी योग आहेत. तुमच्या इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. वेळ दवडू नका.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. खर्च झाला तर तो योग्य कारणासाठी होईल. दानधर्म केल्यास उत्तम फलित मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा दिवस आहे. प्रवास घडतील. आनंदी राहाल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) नोकरी व्यवसायात मोठी घोडदौड होईल. नवीन संधी चालून येतील. अनुकूलता वाढेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) मोठे प्रवास घडतील. गुरू सन्निध लाभेल. प्रेमात यश मिळेल. शुभ समाचार समजतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. आर्थिक बाजू मजबूत होईल. भ्रमंती घडेल. दगदग वाढेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्तम स्थानी गुरू चंद्र युती आहे. सर्वर्थें चांगला दिवस आहे. जोडीदाराला वेळ द्याल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. अर्थकारण चांगले चालू राहील. नैतिक बाबींसाठी वेळ आणि पैसे खर्च कराल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) उत्तम ग्रहमान आहे. संतती बाबत शुभ समाचार समजतील. दागिने मिळतील. खुश राहाल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) कलाकारांना उत्तम दिवस आहे. नवीन संधी मिळतील. मेजवानी मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक बाबतीत उत्तम दिवस आहे. कामे पूर्ण होतील. लेखनातून लाभ होतील. तुमच्या हस्ते चांगले काम घडेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) मेजवानी मिळेल. पाहुणे येतील. स्वतःच्या चैनीवर खर्च कराल. अंतर्मुख व्हाल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment