दैनिक राशिभविष्य
सोमवार, २५ मार्च २०२४.
फाल्गुन पौर्णिमा. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - उत्तरा/ हस्त. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
"आज करी दिन आहे."
मेष:- प्रशासकीय कामाना खीळ बसेल. विनाकारण खर्च होईल. आरोग्य सांभाळा.
वृषभ:- अनुकूल रवी प्रतिष्ठा वाढवेल. सन्मान मिळतील. मात्र खर्च देखील वाढेल. अंदाज चुकतील.
मिथुन:- घरगुती पातळीवर कटकटी संभवतात. शांतता आणि संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवा.
कर्क:- संमिश्र दिवस आहे. काही उत्तम योग होत आहेत. अर्थ प्राप्ती होईल.
सिंह:- प्रतिकूल दिवस आहे. महत्वाची कामे आज नकोत. नेहमीची कामे चालू ठेवा.
कन्या:- जोडीदाराशी मतभेद संभवतात. काही तडजोडी स्वीकराव्या लागतील. सरकारी कामात दिरंगाई नको.
तुळ:- प्रतिकूल ग्रहमान आहे. कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत. कनिष्ठ व्यक्तींवर फार विसंबून राहू नये.
वृश्चिक:- चंद्र अनुकूल आहे. कामे पुढे सरकतील. मात्र शेअर्स मध्ये नुकसान होऊ शकते.
धनु:- घर आणि नोकरी यात ओढाताण होऊ शकते. कामाचा ताण वाढेल. सामाजिक दायित्व निभावाल.
मकर:- संमिश्र दिवस आहे. आयुष्याच्या वळणावर काही छोटे संकटे येऊ शकतात. त्यास धीराने तोंड द्याल.
कुंभ:- प्रतिकूल दिवस आहे. चूक होऊ शकतात. बोलताना काळजी घ्या. वादविवाद टाळा.
मीन:- सप्तम स्थानी चंद्र आहे. सूर्याशी प्रतियुती आहे. प्रिय व्यक्तींशी मतभेद संभवतात. मन स्थिर ठेवा.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment