दैनिक राशिभविष्य
शुक्रवार, २२ मार्च २०२४
. फाल्गुन शुक्ल त्रयोदशी. शिशिर ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज वृद्धी दिन आहे. *प्रदोष*
चंद्रनक्षत्र - मघा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) प्रतिकूल दिवस आहे. सरकारी कामात अडथळे येतील. प्रतिष्ठा पणाला लागेल. उधारी वाढेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो)
अपेक्षित कामास उशीर लागेल. वाट बघावी लागेल. संयम महत्वाचा आहे. नोकरीच्या ठिकाणी वाद टाळा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) संमिश्र दिवस आहे. कामाच्या ठिकाणी कटू अनुभव येतील. प्रवासात त्रास संभवतो.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) काळजी घेणे आवश्यक आहे. खोटे आरोप होऊ शकतात. वाहन जपून चालवा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) भागीदारी व्यवसायात मतभेद होतील. चोरीचे भय आहे. कनिष्ठ सहकाऱ्याकडून त्रास संभवतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल दिवस आहे. व्यव स्थानी चंद्र आहे. खर्चात वाढ होईल. सरकारी कामात नुकसान संभवते.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) शेअर्स मध्ये नुकसान होऊ शकते. अंदाज चुकतील. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतात. क्रोधावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) भावनेच्या भारत निर्णय घेऊ नका. सारासार विचार करा. भावंडांशी मतभेद होऊ शकतात.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) वाणीवर संयम आवश्यक आहे. लोकांची मने दुखवू नका. राजकीय क्षेत्रात वाट बघावी लागेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीतील मंगळ चंद्राशी प्रतियुती करत आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवा. चुकीचे निर्णय होऊ शकतात. खाण्याची पथ्ये पाळा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्या राशीतील रविचा चंद्राशी अशुभ योग आहे. अधिकाराचा गैरवापर टाळा. वाहन दुरुस्ती करावी लागेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment