दैनिक राशिभविष्य
सोमवार, ४ मार्च २०२४
माघ कृष्ण अष्टमी/नवमी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - जेष्ठ/मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी -वृश्चिक/धनु.
"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे."
मेष:- आर्थिक दृष्टीने अत्यंत उत्तम दिवस आहे. व्यापारात यश. वाहन सावकाश चालवा.
वृषभ:- उत्तम दिवस आहे. प्रेमात यश मिळेल. प्रिय व्यक्ती समवेत सहल घडेल. आर्थिक लाभ होतील.
मिथुन:- सहावा चंद्र आहे. शुक्राशी शुभ योग आहे. मौल्यवान खरेदी होतील. भेटवस्तू मिळतील.
कर्क:- जोडीदार खुश होणार आहे. विवाह इच्छुकांना चांगली बातमी समजेल. अचानक लाभ होतील.
सिंह:- अर्थलाभ होतील. व्यवसाय वाढेल. शेअर्स मधून लाभ संभवतात. स्वप्ने साकार होतील.
कन्या:- दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. कामाचा वेग वाढेल. प्रेमात यश मिळेल. उत्तरार्ध संथ आहे.
तुळ:- अनुकूल दिवस आहे. मोठे निर्णय घ्याल. कला प्रांतात चमक दाखवाल.
वृश्चिक:- आनंदी दिवस आहे. उत्साह वाढेल. दागिने खरेदी होईल. लेखनातून लाभ होतील.
धनु:- दिवसाचा उत्तरार्ध चांगला आहे. हळूहळू कामाचा वेग वाढेल. वक्तृत्व गाजेल.
मकर:- अत्यंत उत्तम दिवस आहे. सुरुवात जोरदार असणार आहे. प्रणयरम्य कालावधी आहे.
कुंभ:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. आवडत्या वस्तूसाठी खर्च कराल. दिवसाचा उत्तरार्ध अधिक अनुकुल आहे.
मीन:- अचानक एखादी सुखद घटना घडेल. विद्यार्थ्यांना यशदायी दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment