जितो चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत महिलांचे वर्चस्व

 जितो चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत महिलांचे वर्चस्व जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य दिशा पाटील उपविजेती सांगलीची सारा हरोले तृतीय


कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

जितो कोल्हापूर चॅप्टर ने डी.सी.प्लाझा, नागाळा पार्क येथील जितोच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केलेल्या जितो चषक खुल्या व निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या‌.खुल्या गटात झालेल्या या स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिव्या व दिशा पाटील या जुळ्या भगिनीनी अपेक्षेप्रमाणे विजेते व उपविजेतेपद पटकाविले.अंतिम सातव्या फेरीनंतर दोघींचे सात पैकी समान साडेसहा गुण झाले‌‌‌‌ होते बकोल्झ टायब्रेक गुणांनुसार अग्रमानांकित दिव्या अजिंक्य ठरली तर द्वितीय मानांकित दिशाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.पाचवी मानांकित सांगलीच्या सारा हरोलेने सहा गुणासह तृतीय स्थान मिळविले.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ जीतो कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष गिरीश शहा, कन्व्हेनर जितेंद्र राठोड, चिफ सेक्रेटरी अनिल पाटील, खजिनदार रमणलाल संघवी,  उपाध्यक्ष रवी संघवी,  लेडीज विंग अध्यक्ष श्रेया गांधी, सचिव माया राठोड ,यांच्या हस्ते करण्यात आला‌‌.यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, राष्ट्रीय पंच आरती मोदी, सांगलीचे चंद्रकांत वळवडे व राजेंद्र मकोटे इत्यादी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री व सौ राहुल डिग्रज रुकडी, श्री व सौ सचिन हरोले सांगली,श्री व सौ.कविता पाटील जयसिंगपूर व जितो चे अजित उपाध्ये,चेतन नांदणीकर सांगली यांनी विशेष परिश्रम घेतले‌.

24 व 25 मे रोजी बेंगलोर येथे होणाऱ्या जितो नॅशनल बुद्धिबळ स्पर्धेसाठी 16,18 व 20 वर्षाखालील मुला मुलींचा संघ खालीलप्रमाणे निवडण्यात आला.

सोळा वर्षाखालील

 मुली:- 1) दिव्या पाटील जयसिंगपूर 2) सिद्धी कर्वे जयसिंगपूर

 मुले :- 1) ओम कनवडे मिरज 2) अवनीत नांदणी कर सांगली

अठरा वर्षाखालील

 मुली :- 1) दिशा पाटील जयसिंगपूर 2) अदिती कापसे नांदणी

मुले :- 1) अनय दोशी कोल्हापूर 2) रुचित मुके सांगली.

वीस वर्षाखालील

 मुली :- 1) सारा हरोले सांगली 2)  वेदांती पाटील जयसिंगपूर

मुले :- 1) सम्मेद पाटील इचलकरंजी 2) पार्श्व लिगाडे सांगली


उत्तेजनार्थ बक्षीस हे खालील प्रमाणे

आठ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुले:- 1)  सनय लाळे नांदणी 2) अयांश दोशी कोल्हापूर

दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुली:- 1) थिया शहा इचलकरंजी 2) सिद्धी चौगुले अब्दुल लाट

मुले:- 1) अवनीत नांदणीकर सांगली 2) अयांश शहा सांगली

बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुली:- 1) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2) वेदांती पाटील जयसिंगपूर

 मुले:- 1) रुचित मुके,सांगली 2) वरुण गिरमल, अब्दुल लाट

चौदा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

 मुली:- 1)अनया व्हनवाडे नांदणी 2)पवित्रा पल्लके जयसिंगपूर

मुले:- 1)अनय दोशी कोल्हापूर 2)आरव श्रीश्रीमाळ कोल्हापूर

 सोळा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुली:- 1)अदिती कापसे नांदणी 2)श्रेया पाटील जयसिंगपूर

मुले:- 1)ओम कनवाडे मिरज 2)अक्षत निल्ले कोल्हापूर

अठरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुले:- 1) केवल मेहता कोल्हापूर

वीस वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू

मुले:- 1) सम्मेद पाटील इचलकरंजी

Comments