दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य 

बुधवार, ६ मार्च २०२४





. माघ कृष्ण एकादशी. शिशिर ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १२.०० ते दुपारी १.३० 


"आज दुपारी १२.०० नंतर चांगला दिवस आहे" *विजया (स्मार्त) एकादशी.*


नक्षत्र - पूर्वाषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु/मकर.   


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक एखादी सुखद घटना घडेल. मन प्रसन्न होईल. तीर्थाटनाचे योग येतील.

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दिवसाची सुरुवात संमिश्र असणार आहे. खर्च वाढला तरी तो योग्य कारणासाठी होईल. संध्याकाळ आनंदाची.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम ग्रहमान आहे. भ्रमंती घडेल. सहलीचे योग आहेत. अचानक लाभ होतील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्तम संवाद घडेल. स्त्री धन वाढेल. खरेदी होईल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चंद्र - हर्षल शुभ त्रिकोण योग आहे. ग्रहमान प्रसन्न आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळतील. अचानक धनलाभ होईल.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) घरगुती कामात वेळ जाईल. हरवलेले गवसेल. जुने मित्र भेटतील. आनंदी राहाल.

 



तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थप्राप्ती होईल. प्रेमात यश मिळेल. वाहन सौख्य लाभेल. शेअर्स मध्ये यश मिळेल.

  

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) बाग बगीचा, शेतीशी संबंध येईल. कामात बदल घडेल. लाभ होतील.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) तुमच्याच राशीत चंद्र आहे. महत्वाची कामे आज पूर्ण करा. लेखनातून लाभ होतील. कलाप्रदर्शन कराल.  

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवसाची सुरुवात संथ होणार आहे. लाभदायक कामे होतील.  कार्यमग्न राहाल. खर्चात वाढ.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संध्याकाळ प्रयन्त अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. महत्वाची कामे पूर्ण करा. मोठे निर्णय घ्याल. संध्याकाळ आरामाची.

  

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) लवकरच अनुकूलता वाढणार आहे. अडथळे दूर होतील. गायकांना यश लाभेल.

 

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी -  8087520521)

Comments