महेंद्र चषक खुल्या जलद स्पर्धा : आदित्य सावळकर अजिंक्य; ऋषिकेश कबनूरकर उपविजेता तर सोहम खासबारदार तृतीय स्थानी
महेंद्र चषक खुल्या जलद स्पर्धा : आदित्य सावळकर अजिंक्य; ऋषिकेश कबनूरकर उपविजेता तर सोहम खासबारदार तृतीय स्थानी
कोल्हापूर 30 सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूर च्या मान्यतेने नवकार चेस फौंडेशनने न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कै.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या बुद्धिबळ हॉलमध्ये आयोजित केलेल्या महेंद्र चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपदाचा मानकरी ठरला त्याला रोख दोन हजार रुपये व महेंद्र चषक देऊन गौरविण्यात आले.पाचवा मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरला सात गुणासह उपविजेतेपद मिळाले.सातवा मानांकित कोल्हापूरच्याच सोहम खासबागदारने साडेसहा गुणासह तृतीय स्थान पटकावले. द्वितीय मानांकित मिरजेचा मुद्दसर पटेल व तृतीय मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम हे दोघे सहा गुणासह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ महेंद्र ज्वेलर्स चे कुशल ओसवाल, लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्ट चे श्रीराम भुरके, युवा उद्योजक मेहुल जैन, एस एम पी एस हॉस्पिटलच्या संचालिका प्रार्थना रौनक शहा , दिलीप पोतदार,भाजपचे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ आप्पा लाड व नवकार फाउंडेशनचे संस्थापक रवी आंबेकर यांच्या हस्ते झाला. आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कै.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी चे सयाजी पाटील, सूर्यकांत चोडणकर, उमेश कांबळे, मनीष चोडणकर, अखिलेश कित्तूरे,सर्वेश सुतार,सविता जितकर, कंचन ठाकूर, ,सौ.सुनिता मदने, सौ.साळुंखे, सौ. सुप्रिया पोर्लेकर, यांनी अथक परिश्रम घेतले. भरत चौगुले, आरती मोदी,अर्पिता दिवाण व अमित दिवाण यांनी पंच म्हणून काम पाहीले.
इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट
6) अभिषेक पाटील मिरज 7) शंतनु पाटील कोल्हापूर 8) संदीप माने सांगली 9) संतोष सरीकर इस्लामपूर 10) स्वरूप जोशी कागल 11) वेदांत दिवाण कोल्हापूर 12) संतोष कांबळे कोल्हापूर 13) व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 14) अरिन कुलकर्णी कोल्हापूर 15) अरिना मोदी कोल्हापूर 16) श्रीकांत मुचंडीकर पुणे 17) आदित्य पाटील नेसरी 18) सौरभ कुंभार देवगड 19) सर्वेश पोद्दार कोल्हापूर 20) आदित्य ठाकूर अतिग्रे 21) प्रथमेश लोटके इचलकरंजी 22) प्रशांत जाधव कोल्हापूर 23) शिवप्रसाद कोकणे मिरज 24) अथर्व अलदार सांगली 25) सिद्धार्थ चौगुले कोल्हापूर
उत्तेजनार्थ बक्षीस
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1) स्नेहल गावडे कोल्हापूर 2) अर्पिता पवार कोल्हापूर 3) शरयू साळुंखे कोल्हापूर 4) सृष्टी जोशीराव कोल्हापूर
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अपूर्व ठाकूर अतिग्रे 2) शिवराज भोसले कोल्हापूर 3) चिन्मय टिपुगडे कोल्हापूर 4) प्रणव मोरे कोल्हापूर
बारा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) श्रवण ठोंबरे मोरेवाडी 2) अर्णव पोर्लेकर कोल्हापूर 3) आरुष ठोंबरे मोरेवाडी 4) अर्णव र्हाटवळ कोल्हापूर
दहा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अन्वय भिवरे कोल्हापूर 2) त्रिप्ती सारथा कोल्हापूर 3) राजश्री मुळे कोल्हापूर 4) अखिलेश कुरणे कोल्हापूर
आठ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1) अवनीश जितकर कोल्हापूर 2) अथर्वराज ढोलेे कोल्हापूर 3) भावेश मदने कोल्हापूर 4) अमेय अरभावी गडहिंग्लज
Comments
Post a Comment