नवकार चेस फौंडेशन आयोजित महेंद्र चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा शुक्रवारी कोल्हापुरात
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
नवकार चेस फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी (दिनांक 29 मार्च) रोजी महेंद्र चषक खुल्या बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा खरी कॉर्नर जवळ असलेल्या पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या बुद्धिबळ हॉलमध्ये होणार आहेत.
महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून बक्षीस विजेत्यांना रोख बक्षीसासह,ट्रॉफीस,मेडल्स व महेंद्र चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
याचबरोबर सीमाज् मोहक लस्सी, न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी व लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्ट हे सहप्रयोजक आहेत.अशी माहिती नवकार चेस फाउंडेशनचे अध्यक्ष रवी आंबेकर आणी स्पर्धेचे मुख्य पंच व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने या स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार सकाळी दहा वाजता महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल,न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे,लक्ष्मीपुरी जैन मंदिराचे अध्यक्ष कांतीलालजी संघवी, गुजरी जैन मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र राठोड,मोहक लस्सीच्या सौ.सीमा संजय शहा,रौनक शहा,लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर वेस्टचे श्रीराम भुरके, व्ही.पी.चेस अकॅडमीच्या वंदना पोतदार यांच्या हस्ते होणार आहे.उद्घाटनानंतर साडेदहा वाजता स्पर्धेची पहिली फेरी सुरू होईल.
तरी इच्छुक बुद्धिबळपटूंनी नावनोंदणीसाठी रवी आंबेकर - 9049211894 यांच्याशी संपर्क साधावा व अधिक माहिती घ्यावी.
Comments
Post a Comment