मनसेच्या आमरण उपोषणाला मोठं यश


   महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर तर्फे गोरगरीब नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर  करण्यात आलेल्या 7  दिवस आमरण उपोषणाला मोठं यश

 


कोल्हापूर ५ सिटी न्यूज नेटवर्क 

 मनसे कोल्हापूरच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयाने कोल्हापुरातील पंधरा हजार शेतकऱ्यांना 65  कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार.

       मनसे कोल्हापूरच्या आक्रमक व वैचारिक लढ्यामुळे करण्यात आलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाला कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यास भाग पाडले. 

        या शासन निर्णयाचे स्वागत करून शेतकऱ्यांच्या न्यायाचा विजय उत्सव छत्रपती शिवाजी चौकामध्ये मनसे कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून , फटाक्यांची आतीषबाजी व घोषणांनी शिवाजी चौक दुमदुमून टाकला. यावेळी चौकामधील उपस्थित करवीरवासीयांना मनसे पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंद द्विगुणीत करीत साजरा केला.

      याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील , तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील,  विजय करजगार, यतीन होरणे, निलेश आजगावकर, अरविंद कांबळे, राजन हुल्लोळी, गणेश तेरवाडे, पवन रजपूत, प्रणव लोहार, अजिंक्य शिंदे, सुरज कानुगडे, शिवराज भोसले, अमित साळुंखे, सागर साळुंखे,  चंद्रकांत सुकते, रणजीत वरेकर,  दिलीप पाटील, राहुल पाटील, कृष्णा शिंदे, संतोष खटावकर, सुनील तुपे, संजय परिते, रत्नदीप चोपडे, वारा जांभळे,  इत्यादी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments