युवा पत्रकार संघाच्या वतीने इको फ्रेंडली रंगपंचमी उत्सव साजरा
कोल्हापूर दि.30 सिटी न्यूज नेटवर्क
युवा पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या इको फ्रेंडली कोरडी रंगपंचमी दर वर्षी साजरा करण्यात येततो त्या अनुषंगाने आज मुख्य कार्यालय शाहूपुरी येथे पत्रकांच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळून समाजामध्ये "जल हे तो जीवन है." पाण्याचे संवर्धन करा... पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित करा.. असे संदेश देत. फिल्मी गाण्यावर ठेका धरत उत्साहात सन साजरा केला. यावेळी बी न्यूजचे मुख्य बातमीदार प्रमोद वहनगुते यांनी मनोगत व्यक्त करताना खरोखरच युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असून समाज प्रबोधनात्मक अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवत असून याच्यासह पत्रकारांच्या अडीअडचणी व पत्रकार हिताचे कार्यक्रम राबवत आहे, पत्रकार हे समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या लेखणीच्या आधारे न्याय मिळवून देत असते शासन व सर्वसामान्यच्या मधील दूरी कमी करण्याचे काम प्रामुख्याने पत्रकार करत असतो अशा समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांच्या हितासाठी झटणारे अनेक संघटना आहेत त्या पैकी एक युवा पत्रकार संघ असून त्यांच्या सर्व कार्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याबद्दल मला विशेष आनंद आहे भविष्यात युवा पत्रकार संघटना शिखर संस्था म्हणून नावलौकिक मिळवेल अशी आशा मी व्यक्त करतो. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छाे देतो.
प्रदीर्घकाळ पत्रकारितेत कार्यरत असलेले क्रीडा क्षेत्रातीलल बातमीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवलेले नंदकुमार तेली यांनी युवा पत्रकार संघाचे आजच्या या इको फ्रेंडली रंगपंचमी उपक्रमाचे प्रशंस्ता करून अशा अनेक उपक्रम शहरी व ग्रामीण भागामध्ये पत्रकारांच्या वतीने झाली पाहिजे ग्रामीण भागामध्ये अनेक पत्रकारांचे जीवन एकदम हलाखीचे असून तुटपुंज मानधनावर काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत त्यांना अशा पत्रकारांसाठी संघटनेच्या माध्यमातून काही करता आलं तर मी माझे गेले अनेक वर्ष खर्चिक करून मिळवलेला पत्रकार क्षेत्रातील अनुभवाचा मी युवा पत्रकार संघाच्या उपक्रमामध्ये मदत करण्यास तयार आहे.
युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी बोलताना प्रतिवर्षी युवा पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या रंगपंचमी मुळे होणार्या पाण्याचा नासाडीने भविष्यात पुढच्या पिढीला पाणी पाणी करावे लागू नये अशी चिंता वक्त करून.
आपन सर्वजण खुप भाग्यवान आहोत. कि राजर्षी शाहू महाराज यांनी पुढील शंभर वर्ष पाणी कोल्हापूरकरांना कसे मिळेल याची दूरदृष्टी ठेवून राधानगरी धरण बांधले कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी, रंकाळा तलाव, कळंबा तलाव, राजाराम तलाव या प्रामुख्याने तलाव असून आपल्याला कधीच पाण्याची टंचाई भासणार नाही याची खात्री असून सुद्धा आपण पाण्याचे संवर्धन केले पाहिजे पाण्याचे काटकसर पाणी सर्वाना मुबलक मिळेल या हेतूने वायफळ खर्च करू नये असे ते म्हणाले
या वेळी अमोल पोतदार, रतन हुलस्वार , जावेद देवडी, अक्षय थोरवत, नाझ आतार, अमर देसाई शरद माळी युवराज मोरे नियाज जमादार अजय शिंगे कौतुक नागवेकर विजय देसाई प्रदीप चव्हाण बाबुराव वळवडे, सतीश चव्हाण व परिसरातील नागरिक सहभाग होते.
Comments
Post a Comment