दैनिक राशिभविष्य
सोमवार, २२ एप्रिल २०२४
. चैत्र शुक्ल चतुर्दशी. वसंत ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - हस्त/चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
"आज उत्तम दिवस आहे." *महादेवाला दवणा वहाणे*
मेष:- आर्थिक उलाढाल वाढेल. मात्र खर्च देखील वाढणार आहे. व्यसने टाळावीत.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. शेअर्समध्ये मोठी जोखीम घेऊ नये. नवीन खरेदी होईल.
मिथुन:- कामाच्या ठिकाणी निर्माण झालेले तणाव घरी काढू नयेत. भिन्न लिंगी व्यक्तीकडून त्रास संभवतो.
कर्क:- आर्थिक आवक चांगली राहील. चैनीकडे कल राहील. प्रवास घडतील. वाहन सुख लाभेल मात्र त्यात अडथळे येऊ शकतात.
सिंह:- संमिश्र दिवस आहे. आवडते पदार्थ चाखायला मिळतील. अर्थकारण मजबूत होईल. मात्र गैरमार्ग टाळा.
कन्या:- आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. मात्र पत्नीची नाराजी दूर करावी लागेल.
तुळ:- प्रतिकूल दिवस आहे. विनाकारण कटकटी होऊ शकतात. संशय कल्लोळ टाळा. खर्च वाढतील.
वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. चंद्राची प्रसन्नता लाभेल. प्रवास घडतील. सहलीचे योग आहेत.
धनु:- कामाच्या ठिकाणी एकाग्रता आवश्यक आहे. घरगुती बाबींमध्ये मन गुंतून राहू शकते. वाहन दुरुस्ती करून घ्यावी.
मकर:- प्रवास टाळणे हिताचे आहे. लेखकांनी संयम ठेवावा. मौल्यवान वस्तू/दागिने सांभाळा.
कुंभ:- अनुकूलता नाही. मोठे आणि महत्वाचे कामे आज नकोत. घशाची काळजी घ्या. बोलताना शब्द जपून वापरा.
मीन:- तुमच्या सोबतच कुटुंबाच्या हौशी/ मौजी संभाळव्या लागतील. अन्यथा नाराजी उघड होईल. व्यसने टाळा. कमी बोला.
(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, 'राशीभाव' या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)
Comments
Post a Comment