माजी आमदार अमल महाडिक यांच्या प्रचाराचा झंजावत : गावच्या पारावर -मंदिराच्या पायऱ्यावर कधी चालत तर कधी बुलेट वरून सहज संपर्क
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रा . संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मा.आमदार अमल महाडिक यांनी प्रचाराचा झंजावाती दौरा चालू ठेवला आहे गावच्या पारावर मंदिराच्या पायऱ्यावर कधी चालत तर कधी बुलेट वरून कधी दुकानदाराशी थेट संवाद तर कधी महिला वर्गांना अभिवादन करत त्यांची करत लहान मोठ्या बैठकासह कॉर्नर सभा पर्यंत विविध पैलूनी गतिमानतेने प्रचार सुरू आहे . सांगवडे यांनी उपस्थित राहून बुथ बैठक ,कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात केले .यावेळी डॉ.महावीर पाटील यांची कन्या दिप्ती महावीर पाटील हिचा सी.ए झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांच्या कुटुंबाला भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सांगवडे ग्रामपंचायत सदस्य शितल भेंडवडे व सनी काशिंबरे , सुरेश कोलिलकर,यशवंत चव्हाण, कृष्णात लोंढे, संजय सुमारे, शिवाजी जाधव, आणा तेली,बाबासो देसाई, नरसु लोंढे, वजीर पाटील, डॉ. महावीर पाटील,प्रदीप पाटील, आनंदा गुरव,भालचंद्र गुरव ,प्रसाद गुरव,अशोक पाटील,यशवंत त्रिरपणकर,भरत पाटील मेढे,अविनाश रावळ,श्रीकांत गुरव,दत्ता रावळ,महावीर पाटील( मा.सरपंच),सर्जेराव काशिंबरे, विनोद कुंभार,सुशांत सुतार,सचिन गुजर, भारती कटके मा.सरपंच,जितेंद्र जाधव ,अमर जाधव, सतिश बिरांजे,गजानन चौगुले,अनिकेत चांदणे,विक्रम कोळी,विजय कोळी,अशोक कोळी,विक्रम जाधव,विजय कांबळे ,बचतगट महिला व इतर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.अमोल महाडिक यांना प्रचारादरम्यान मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आणि त्यांच्या सह संवादा तून होत असलेले हितगुज पर प्रबोधन पाहता प्रा . संजय मंडलिक यांना कोल्हापूर दक्षिण मधून नक्कीच दखल पात्र असे मताधिक्य मिळेल आणि ही आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी ठरेल असा विश्वास प्रकर्षाने नागरिक मतदाराच व्यक्त करीत आहेत . या संदर्भानेही हि लोकसभा निवडणूक ही आगामी 7 महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीची रंगीत तालीम - सेमी फायनल च ठरत आहे .
Comments
Post a Comment