दैनिक राशिभविष्य
मंगळवार, ३० एप्रिल २०२४.
चैत्र कृष्ण षष्ठी/सप्तमी. ग्रीष्म ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
"आज क्षय तिथी आहे"
नक्षत्र - उ. षा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु/मकर.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. सर्च क्षेत्रात यश मिळेल. अचानक लाभ होतील. दुपारचं सत्रात गैरसमज टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दुपारनंतर चांगला कालावधी आहे. अनुकूल मंगळाशी चंद्राचा शुभ योग आहे. अधिकार वाढतील. यश मिळेल.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करा. अनुकूल गुरू चंद्र योगाचा लाभ मिळेल. अचानक फायदा होईल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकुल दिवस आहे. नोकरीत मनासारख्या गोष्टी घडतील. अचानक लाभ होतील. महिलांशी अदबीने वागा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) चांगला दिवस आहे. प्रगती होईल. वाहन सुख लाभेल. आर्थिक नफा वाढेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. अधिकार वाढतील. घरगुती कामासाठी वेळ द्यावा लागेल. कोर्टात यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आर्थिक दृष्टीने यश देणारा कालावधी आहे. पत्नीची मोलाची साथ लाभेल. शत्रू पराभूत होतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक बाजू मजबूत होईल. संतती कडून अचंबित करणारी प्रतिक्रिया येईल. आरोग्य सांभाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) दुपारनंतर अनुकुलता वाढेल. पंचम गुरू संतती बाबत समाधानकारक बातमी देईन. प्रेमात यश मिळेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दुपारनंतर वातावरण अनुकूल होईल. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात जपून रहा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सकाळच्या सत्रात महत्वाची कामे मार्गी लावा. नंतर चंद्र व्यय स्थानी जाणार आहे. विनाकारण खर्च वाढतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. कठोर निर्णय घ्याल. दबदबा वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल.
३० एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ गुरू आणि हर्षल या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आयुष्यात सतत पुढे येण्याचा प्रयत्न करीत असतात. तुमच्यात जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते. तुम्ही बुद्धिमान असतात आणि तुमच्या ज्ञानाविषयी तुम्हाला अहंकार असतो. तुम्ही धार्मिक असले तरी रूढी आणि परंपरा तुम्हाला आवडत नाहीत. तुम्ही बंडखोर विचारांचे आहात. इतरांच्या भल्यासाठी तुम्ही कष्ट घेतात. सुखासीन जीवनाकडे तुमचा ओढा असतो आणि भिन्नलिंगी व्यक्तींकडून तुम्हाला लाभ होतात. इतरांचे बारीकसारीक दोष तुम्ही सहज रित्या काढू शकतात. तुम्ही पोकळ अभिमान दाखवणे टाळले पाहिजे. इतरां करता तुम्ही स्वार्थत्याग करतात तरी तेच लोक तुमच्यावर कारस्थान करतात. तुम्हाला उपजतच ज्ञान असते आणि पुढे घडणाऱ्या घटनांची जाणीव होते. तुम्ही प्रेमळ असतात आणि लहान मुले तुम्हाला आवडतात. आयुष्यात उशिरा तुम्हाला मानमरातब आणि प्रसिद्धी मिळते. तुम्हाला प्रवासाची आवड असते आणि तुमच्या मध्ये दुर्दम्य उत्साह असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असते आणि आजूबाजूचे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. धार्मिक स्थळांना भेटी देणे तुम्हाला आवडते. शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करतात. तुम्ही सतत कृतिशील असतात तरीही अस्वस्थ असतात. अडचणींना तुम्ही खंबीरपणे तोंड देऊ शकतात. धर्मादाय संस्था अपंगांच्या, संस्था यामध्ये तुम्ही आवडीने काम करतात आणि यासाठी तुम्ही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही. वयाच्या 30 नंतर तुमचा भाग्योदय होतो आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही समाजप्रिय असून क्लब, सिनेमा, नाटके, सहली, प्रवास याची तुम्हाला आवड असते. तुम्ही कलासक्त असतात आणि घराची सजावट उत्तम करतात. कला, शास्त्र, संगीत यांचे तुम्हाला आवड असते. व्यायाम आणि खेळांची देखील तुम्हाला आवड असते.
व्यवसाय:- मंत्री, राजदुत, न्यायाधीश, वकील, सचिव, सावकार, जाहिरात वितरक, अभिनय, संगीतकार, धार्मिक, शिक्षक.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- जांभळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, लसण्या.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment