रिलायन्स ज्वेल्स’तर्फे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर : विंध्य कलेक्शनचे अनावरण

 रिलायन्स ज्वेल्स’तर्फे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर : 

विंध्य कलेक्शनचे अनावरण



बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या हस्ते सणासुदीच्या प्रसंगी ग्लॅमरचा स्पर्श लाभलेल्या नवीन ज्वेलरी कलेक्शनचे अनावरण

 मुंबई ३० सिटी न्यूज नेटवर्क 

भारतातील आघाडीचा दागिन्यांचा ब्रँड रिलायन्स ज्वेल्स’ने यावर्षी अक्षय तृतीयेनिमित्त विंध्य कलेक्शन सादर करून अद्वितीय आणि उत्कृष्ट संग्रहांसह सण साजरा करण्याची आपली परंपरा कायम ठेवली. 'ज्वेल्स ऑफ इंडिया' संग्रह मालिकेतील नवव्या क्रमांकाचे विंध्य हे मध्य प्रदेशातील समृद्ध कलात्मक परंपरांनी प्रेरित आहे. फॅशन आयकॉन आणि बॉलिवूड दिवा दिशा पटानी हिने वाराणसी येथील रिलायन्स ज्वेल्सच्या स्टोअरमध्ये एका विशेष कार्यक्रमात खास सणाच्या कलेक्शनचे अनावरण केले.

 


अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक असलेला शुभ सण, दाग-दागिने खरेदीचा योग्य प्रसंग मानला जातो. हा प्रसंग साजरा करताना, रिलायन्स ज्वेल्स’तर्फे विंध्य कलेक्शनमध्ये मध्य प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला आणि स्थापत्यकलेच्या वैभवाला समर्पित दागिन्यांची एक आश्चर्यकारक मांडणी आहे. ग्वाल्हेर किल्ला, सांची स्तूप, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर आणि मितौली आणि बटेश्वर मंदिरे यासारख्या मध्य प्रदेशातील प्रसिद्ध स्मारकांपासून प्रेरित आराखड्यांसह अलंकाराचा प्रत्येक तुकडा अतिशय बारकाईने तयार करण्यात आला आहे.

 

रिलायन्स ज्वेल्स’चे सीईओ सुनील नायक म्हणाले, "या अक्षय तृतीयेनिमित्ताने विंध्य कलेक्शन’चा शुभारंभ हा भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मध्य प्रदेशच्या समृद्ध परंपरांनी प्रेरित, हा संग्रह आमच्या 'ज्वेल्स ऑफ इंडिया' मालिकेतील नववा असून भारतीय कला तसेच हस्तकलेला समर्पित पावती म्हणून उभा आहे."

 

ते पुढे म्हणाले: "अक्षय तृतीया हा दागिने खरेदीचा एक आदर्श प्रसंग आहे. कारण तो संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक ठरतो. यावर्षी आम्ही आमच्या ग्राहकांना विंध्य कलेक्शनद्वारे घरी समृद्धी आणण्याची एक अनोखी संधी देऊ करतो! हा उत्कृष्ट संग्रह केवळ समृद्धी आणि अभिजाततेचे प्रतीक नसून अक्षय तृतीया आणि आमचा ब्रँड रिलायन्स ज्वेल्सच्या चिरस्थायी उत्सवी भावनेचेही प्रतीक आहे."


 


अभिनेत्री दिशा पटानी हिने रिलायन्स ज्वेल्सच्या वाराणसी स्टोअरमध्ये या कलेक्शनचे अनावरण करताना आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "या कलेक्शनमधील प्रत्येक तुकडा हा मध्य प्रदेशचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि स्थापत्यकलेचे वैभव प्रतिबिंबित करणारा उत्कृष्ट नमुना आहे. मला वैयक्तिकरित्या, हिऱ्याच्या हारांची रचना आवडते, जी उज्जैनमधील विविध मंदिरांमधील घटकांचे सुंदर मिश्रण करते. हे केवळ दागिने नाहीत; ती परंपरा आणि सौंदर्याची अस्सल प्रतीकं आहेत. जी प्रत्येकाच्या वॉर्डरॉबमध्ये असणे आवश्यक आहे".


अचूकतेचा उत्तम नमुना असलेले विंध्य कलेक्शन वैविध्यपूर्ण दागिन्यांची श्रेणी देऊ करते, त्यात व्यवस्थित घडवलेले चोकरपासून बारकाईने डिझाईन करण्यात आलेल्या बांगड्यांचा समावेश आहे. हे दागिने सोने-चांदीत उपलब्ध आहेत. विंध्य कलेक्शन केवळ दागिने नसून हा परंपरा, नजाकत आणि कालातीत सौंदर्याचा जल्लोष आहे. सणासुदीच्या प्रसंगी पारंपरिक साडीवर किंवा समकालीन पोशाखात तसेच तुमच्या दैनंदिन पोशाखात ग्लॅमरचा स्पर्श व्हावा म्हणून परिपूर्ण, दगिन्यांचा प्रत्येक तुकडा अभिजात आणि सुसंस्कृतपणा दर्शवितो, ज्यामुळे तो अक्षय तृतीया शैलीत साजरा करण्यासाठी आदर्श बनतो.


विंध्य कलेक्शन हा रिलायन्स ज्वेल्सच्या 'ज्वेल्स ऑफ इंडिया' या विलक्षण मालिकेतील नवीनतम जोड आहे. जो भारताचे वैविध्यपूर्ण प्रदेश, परंपरा, वास्तुकला आणि हस्तकला ह्यांवर प्रकाश टाकतो. विंध्य कलेक्शन ही मध्य प्रदेशच्या कलात्मक कौशल्य आणि कालातीत अभिजाततेपासून प्रेरणा घेते, तर या मालिकेतील मागील आठ संग्रह भारताच्या सौंदर्याचा पुरावा आहेतः

बंगालचे काव्यात्मक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाला स्वर्ण बंगा कलेक्शनने आदरांजली वाहिली

चोळ साम्राज्याची राजधानी असलेल्या तंजावरच्या ऐतिहासिक समृद्धीतून साकरण्यात आलेले तंजावर कलेक्शन

महाराष्ट्राची भव्यता दर्शवणारे महालय कलेक्शन 

कच्छच्या रणचे नितांत सौंदर्य टिपणारे रणकार कलेक्शन

बनारसच्या वैभवासह चमकणारे काशीम कलेक्शन

ओडिशाच्या किनारपट्टीवरील चैतन्य जागृत करणाऱ्या उत्कल कलेक्शन’च्या अतुल्य संग्रहात राजस्थानचा शाही वारसा आणि मुघल युगातील वैभव

आणि अपूर्वम कलेक्शन हम्पीची स्थापत्यशास्त्रीय भव्यता

 

विंध्य कलेक्शन आता रिलायन्स ज्वेल्सच्या सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहे. या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ग्राहक या आकर्षक वस्तूंचा शोध घेऊ शकतात आणि स्वतःला सजवू शकतात, ज्यामुळे समृद्धी आणि विपुलता येते.

Comments