रंकाळा परिसरात तरुणाचा निर्घृण खून
कोल्हापूर ४ सिटी न्यूज नेटवर्क
आज (दि ४) सायंकाळी रंकाळा परिसरात तरुणाचा पाठलाग करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली. रंकाळा परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे.
अजय दगडू शिंदे असे या मृत तरुणाचे नाव आहे. रंकाळा तलावाजवळ पाच तरुणांनी पाठलाग करत तलवारी, कोयत्यासह तरुणाचा हा खून केल्याची प्राथमिक माहिती माहती आहे. हल्लेखोर खून करुन पसार झाले असल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली आहे.

Comments
Post a Comment