ज्योतिबा चैत्र यात्रेत सहसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचा दोन लाखाच्या वर भक्तांनी घेतला लाभ
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
ज्योतिबा डोंगरावर चैत्र-यात्रेमध्ये लाखो भाविक सहभागी होतात. भक्तांच्या सेवेसाठी सलग 24 व्या वर्षी अन्नछत्राची अखंड सेवेची परंपरा सहज सेवा ट्रस्ट ने राखली. याही वर्षी मोठ्या उत्साहाने नियोजन करण्यात आले होते. मसालेभात शिरा आमटी भाजी याचबरोबर चहा व मठ्ठ्याची सोय करण्यात आली होती. चार दिवस अहोरात्र सेवा देण्यात आली
नंदादीप नेत्रालय मार्फत भक्तांच्या डोळ्याची मोफत तपासणी करण्यात येत होती. याचाही लाभ यावर्षी भक्तांनी मोठ्या प्रमाणात घेतला. कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल व वारणा येथील महात्मा गांधी हॉस्पिटल यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आले व त्यामध्ये जवळजवळ 250 युनिट्स रक्त गोळा करण्यात आले.
आजही यात्रेला बैलगाडीतून येणारे भक्तगण आहेत. अशा सर्व बैलगाड्यांच्या बैलांच्यासाठी कपरी पेंड व भुशाचे वाटप सहज सेवा ट्रस्ट मार्फत करण्यात आले होते. मार्फत करण्यात आली. यात्रा काळात शासकीय कर्मचारी सेवाभावी संस्था पोलीस व यात्रा यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्ती यांना देखील जेवणाची फूड पॅकेट्स देण्यात आली.
यात्रा संपल्यानंतर सहज सेवा ट्रस्ट करिता ज्या ज्या कामगारांनी आपली सेवा दिली त्या सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला व प्रत्येक स्त्रीला एक साडी व रोख रक्कम देण्यात आली तर प्रत्येक पुरुषाला व त्याच्या मदत निसाला एक पॅन्ट पीस व एक शर्ट पीस तसेच रोख रक्कम देण्यात आली.
यावर्षी ची यात्रा प्रशासनाने प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केलेला होता. प्रशासनाच्या या प्रयत्नाला सहकार्य म्हणून सहज सेवा ट्रस्टने प्लास्टिकचा वापर कुठेही केलेला नाही.
यावर्षी प्रशासनाने गायमुख परिसरामध्ये इनाम जमिनीमध्ये 24 एकर क्षेत्रावर चार चाकी गाड्यांसाठी पार्किंगची मोठ्या प्रमाणात आणि चांगली सोय केलेली होती. हे संपूर्ण पार्किंग क्षेत्र सहज सेवा ट्रस्ट अन्नछत्राच्या शेजारीच असल्यामुळे तेथे गाड्या लावणाऱ्या सर्व भक्तांनी अन्नछत्राचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment