देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची स्वीकारणे हा काळा दिवस - - सकल हिंदू समाजाचे मत
देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांची स्वीकारणे हा काळा दिवस - - सकल हिंदू समाजाचे मत
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी स्वीकारणे हा कोल्हापूर जिल्ह्यातील काळा दिवस आहे, असे आम्ही मानतो. ‘ए.एम्.आय.एम्.’चा पाठिंबा स्वीकारून महाराज जिल्ह्यात जिहादी हिरव्या सापांना राजाश्रय का देत आहेत का ? उद्या जर कोल्हापूर येथे धर्मांध जिहादी सिद्ध झाले, तर याचे सर्वस्वी दायित्व हे महाराजांचे असेल. तरी निवडणुकीसाठी कोल्हापूरकरांचे भविष्य अंधारात लोटू नका, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने २४ एप्रिलला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक सुनील सामंत, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, अर्जुन आंबी, श्री. योगेश केरकर उपस्थित होते.
सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, औरंगाबादच्या नामांतरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आणि त्याचे संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. या निर्णयास ‘ए.एम्.आय.एम्.’ने विरोध दर्शवला. संभाजीनगर येथे जातीय दंगली घडवून आणल्या. त्यामुळे हिंदू समाजाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध करणार्या लोकांना देशविरोधी म्हटले पाहिजे. त्यामुळे करवीर संस्थानचे आताचे वंशज शाहू छत्रपती ‘ए.एम्.आय.एम्.’चा पाठिंबा स्वीकारतात ही गोष्ट कोणत्याही शिवभक्ताला पटणारी नाही.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना हा डाव मोडून काढतील आणि काँग्रेसच्या विरोधात प्रचार करतील, हे लक्षात घ्यावे. कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वाची शक्ती जागृत होऊन काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करतील 'असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे .या संदर्भात थेट उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी भूमिका जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे .

Comments
Post a Comment