सामाजिक सकारात्मकता वाढीसाठी "सोहम्" समाजातील सर्व थरापर्यंत पोहचविण्यासाठी विविध स्वंयसेवी संस्थानी सक्रीय व्हावे - उज्वल नागेशकर

 सामाजिक सकारात्मकता वाढीसाठी "सोहम्" समाजातील सर्व थरापर्यंत पोहचविण्यासाठी विविध स्वंयसेवी संस्थानी सक्रीय व्हावे - उज्वल नागेशकर        





           कोल्हापूर  २९ सिटी न्यूज नेटवर्क 

सोहम चित्रपटा मधून  सिद्धगिरी कणेरी मठाच्या पंधराशे वर्षाची परंपरा सक्षमपणे दाखवण्यात आली असून या यामध्ये अध्यात्मिक परंपरेसह समाज उपयोगी सेंद्रीय शेती - शिक्षण - वैधकीय सह विविध पैलूच्या योगदानाची ही यथायोग्य योग्यपणे नोंद घेण्यात आली आहे त्यामुळे समाजातील सकारात्मकता वाढवण्यासाठी हा चित्रपट मूल्य शिक्षणाचा भाग म्हणून समाजातील सर्वांनी आग्रहाने पावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते उज्वल नागेशकर  यांनी केले . लवकरच अक्रॉस इंटरटेनमेंट ची निर्मिती असलेला  हा चित्रपट भव्य प्रमाणात प्रदर्शित होणार आहे .या संदर्भाने आयोजित पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते .चैताली सभागृहात ही बैठक संपन्न झाली .         


               प्रांरभी  या चित्रपटाची पार्श्वभूमी सांगताना निर्माते संजय बहिरे यांनीअध्यात्मिक पंरपंरा  आणि त्यानिमित्ताने संकलित मनुष्यबळाची   सकारात्मक विविध पैलूंनी कशाप्रकारे प्रभावीपणे उपयोग करता येतो याची सिद्धीगिरी केलेली मठ आणि परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज हे अनुकरणीय उदाहरण आहेत त्यांचे विविध पैलूंचे समाज उपयोगी काम संस्थेने सर्व समोर यावे यासाठी ही निर्मिती ही सोहम् चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे , सर्वाच्या सहभागाने यांचे दमदार प्रदर्शन होई ल ' असे नमूद केले .     

 प्रारंभीसर्वांचे स्वागत करताना धनश्याम पटेल यांनी येत्या मे महिन्यात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा चित्रपटाचे वितरण केले जाणार आहे हा चित्रपट शालेय महाविद्यालय योग्य ज्येष्ठ नागरिकांनी पहावा यासाठी त्याची पूर्वपटिका सर्वांपर्यंत जावी यासाठी विविध पैलूंनी सर्वांनी कार्य करावे असे आहवान केले .              

                             समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांनी यावेळी आलेल्या विविध सूचनांचा आढावा घेत यासंदर्भात व्यापक बैठक घेऊन सिद्धगिरी मठ संदर्भातील सर्वांच्या सर्व हितचिंतकांच्या सूचना लक्षात घेऊन सर्वांना यामध्ये सक्रीय राहावे ' अशी अपेक्षा व्यक्त केली .                                                                चित्रपटातील पर्यावरण विषयक विविध प्रकल्पातून व्यक्त झालेले पैलू हे सध्याच्या निकडीची  गरज असून त्या दृष्टीने हा सोहम चित्रपट महत्त्वाचा असल्याचे मत उदय गायकवाड यांनी व्यक्त केले . माणिक पाटील चुयेकर यांनी ' जिल्हा परिषद ते विविध शाळां ते   महाविद्यालय पर्यंत हा चित्रपट पोहोचावा यासाठी हा चित्रपट करमुक्त व्हावा यासाठी आग्रह धरावा अशी विनंती केली .सिद्धगिरी मठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यशोवर्धन बारामतीकर यांनी या चित्रपटाने निमित्ताने सलगतेने आणि प्रभावीपणे मठाचे आणि स्वामींचे काम हे समाजातील सर्वस्तरापर्यंत पोहचणार असून ही संधी नेमकीपणे सर्वांनी व्यापकतेने  साध्य केली पाहिजे असे मत व्यक्त केले .यांच्यासह बांधकाम विकसक शंकर पाटील मराठा महासंघाचे शशिकांत पाटील , आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे यांनी ही आपली मते व्यक्त केली . शेवटी रोटरी क्लब करवीर चे  उदय पाटील यांनी आभार मानले . यावेळी  संभाजी पाटील , राजेश डाके , नारायण देसाई , परशुराम जाधव , मंगेश जागेदार ,विक्रम पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थित होते . .

Comments