सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावरील अन्नछत्र सुरू
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
सहज सेवा ट्रस्ट च्या वतीने जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांसाठी चालवण्यात येणारे अन्नक्षेत्र सलग 24 व्या वर्षीही मोठ्या उत्साहाने सुरू झाले आहे
यात्रेच्या अगोदर दोन दिवस भक्तगण शासकीय कर्मचारी सेवाभावी सवस्था याचे स्वयंसेवक डोंगरावर काम करत असतात याची सोय व्हावी डोंगरावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पोटभर जेवण मिळावे या साठी आज पासून सदरचे अन्नछत्र सुरू करण्यात येते
बैलगाडी घेऊन आलेले भक्तगण बंदोबस्तासाठी असणारे पोलीस आरोग्य विभाग लाईट विभाग इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या अन्नछत्र चा लाभ घेतला
प्रथम येणाऱ्या जोतिबा भक्ताच्या शुभ हस्ते चांगभलं च्या गजरामध्ये अन्नछत्र सेवा सुरू करण्यात आली
मसाले भात शिरा आमटी भाजी लोणचे असा जेवणाचा मेनू आहे त्याचबरोबर चहा मठ्ठा याची ही सोय करण्यात आली आहे
भक्ताच्या सेवेसाठी नंदादीप नेत्रालय याचे वतीने मोफत नेत्र तपासणी सुरू आहे
उद्या बैलगाडी साठी पेंड वाटप करण्यात येणार आहे
आज रविवार असल्या मुळे आज ही भक्ताची गर्दी झाली आहे
प्रशासकीय आधिकरी यांनी येऊन पाहणी केली आहे
आज सुरू झालेले अन्नछत्र 24 तारखेपर्यंत अखंड सुरू राहणार आहे सहज सेवा चे 400 सेवक डोंगरावर दाखल झाले आहेत लाखो लोक गायमुखावर येऊन अन्नक्षेत्राचा लाभ घेतात त्यासाठी जे काय करावे लागणार त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी ट्रस्ट सज्ज आहे
सर्व जोतिबा भक्तांना ट्रस्टतर्फे आव्हान करण्यात येत आहे की सर्वांनी अन्नछत्रचा लाभ घ्यावा
Comments
Post a Comment