जितोच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर चा संघ बेंगलोरला रवाना
कोल्हापूर २४ सिटी न्यूज नेटवर्क
जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या वतीने बेंगलोर येथे 24 व 25 मे रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जितो कोल्हापूर चॅप्टरचा संघ काल राणी चन्नम्मा एक्सप्रेस ने रवाना झाला.बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, लॉन टेनिस स्विमींग व अथलेटिक्स या सहा प्रकारात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतातील जितोच्या चाळीस चॅप्टर मधून साधारण 600 क्रीडापटू सहभागी झाले आहेत.
कोल्हापूर चॅप्टर मधून बुद्धिबळचे दहा खेळाडू व ॲथलेटिक्स चे तीन खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत..
बुद्धिबळ :
मुली - दिव्या पाटील,दिशा पाटील,सारा हरोले,सिद्धी कर्वे,अदिती कापसे व वेदांती पाटील , मुले - अवनीत नांदणीकर,पार्श्व लिगाडे,ओम कनवाडे व रुचित मुके
ॲथलेटिक्स:- मुले - श्रेयन पाटील संस्कार हेरले , मुली - प्रांजली टकले..सोबत संघ व्यवस्थापक म्हणून कविता पाटील,सचिन हरोले,सन्मती कर्वे व अमोल पाटील यांना नियुक्त केले आहे.असे जितोचे कोल्हापूर चाप्टरचे अध्यक्ष गिरीश शहा व सचिव अनिल पाटील यांनी माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment