२५ आणि २६ मे रोजी कोल्हापूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय पेन शो

 २५ आणि २६ मे रोजी कोल्हापूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय पेन शो



कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क 

  २५ व २६ मे रोजी "हॉटेल सयाजी" येथे २ दिवसांचा हा आंतरराष्ट्रीय पेन शो आयोजित करण्यात आलेला आहे.

भारतासह जगभरातील ५०हून अधिक उच्च प्रतीचे ब्रॅण्ड्स व विविध प्रकारचे दोन हजार हून अधिक पेनांचे तसेच उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठी खास पाऊच व केसेस अशा विविध गोष्टी कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी बघण्याची संधी मिळणार आहे.

डॉ. संजय डी पाटील, अध्यक्ष आणि कुलपती डी. वाय पाटील एजुकेशन सोसायटी, श्री. सचिन शिरगांवकर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रिज लिमिटेड, अर्किटेक्ट शिरीष बेरी, श्री. प्रसाद कामत यांच्या उपस्थितीत शनिवारी, २५ मे सकाळी ११.३० वाजता या पेन शो चे उदघाटन होणार आहे.

हा पेन शो सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

कोल्हापुरातील पेन चाहत्यांना जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावीत, यासाठी हा पेन शो आयोजित केला आहे,

विविध ब्रॅण्ड्ससह पुण्यातील प्रसिद्ध व्हीनस ट्रेडर्स यांचे पु ल देशपांडे, डॉ ए पी जे अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटन पेन, शिवजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटूचे पेन प्रदर्शित करणार आहेत.

या पेन शो मध्ये विविध ब्रॅण्ड्सचे फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स पाहायला मिळणार आहेत.

या पेन शो मध्ये पटना, बिहार येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर आणि मुंबईचे प्रसिद्ध वास्तुविशारद प्रोफेसर यशवंत पिटकर यांचे दोन्ही दिवशी मार्गदर्शन लाभणार आहे.

बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे हे मराठीतून वैविध्यपूर्ण स्वाक्षरी करण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील.

या पेन शो मध्ये अँटिक पेन पण उपलब्ध असून आपल्याकडील अशी पेन्स आपण विकू ही शकता.. गौरव कपूर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीची निब्स या पेन शो मध्ये पाहायला मिळतील.

रु. २०० पासून रु. ५.५ लाख पर्यंतची पेन विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहेत.

या दोन दिवसात पेन शो ला भेट देणाऱ्या निवडक कोल्हापूरकरांना लकी ड्रॉ द्वारे प्रीमियम पेन भेट दिली जाणार आहेत. हा आंतरराष्ट्रीय पेन शो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

Comments