दैनिक राशिभविष्य

 दैनिक राशिभविष्य

शुक्रवार, ३१ मे २०२४. 






वैशाख कृष्ण अष्टमी/नवमी. ग्रीष्म ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज चांगला दिवस आहे.  


चंद्रनक्षत्र - शततारका/पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनी चंद्राशी युती करत आहे. सर्व कामे यशस्वी होतील. नवीन वस्तूची खरेदी होईल. 

     

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) 

नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल संभवतात. बौद्धिक क्षमता वापरून तुम्ही अडचणींवर मात करू शकतात. अधिकार वाढतील.

 

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल बुध सकाळच्या सत्रात मोठे यश देईन. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जेष्ठची पास्नंती लाभेल. दूरचे प्रवास घडतील.  


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. कामानिमित्त भटकंती होईल.

 

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. वाहन सुख लाभेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. चोरीचे भय आहे.

  

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. त्यासाठी खर्च कराल. आरोग्य सांभाळा.

 


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल. कोणताही जुगार खेळू नका. संततीची काळजी घ्या.

 

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.

 

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल बुध - चंद्र योग सौख्य प्रदान करेन. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. लाभ होतील.

  

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढतील. कुटुंबासोबत सहल घडेल. पशूंचे प्रेम अनुभवाल. मित्रमंडळी भेटतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) विनाकारण आत्मविश्वास कमी होईल. चिंता वाटेल. मत्सर त्रास जाणवेल. मोठे करार आज नकोत.

 

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. व्ययस्थानी शनी चंद्र युती आहे. खर्चात वाढ संभवते. दानधर्म करण्यास उत्तम कालावधी आहे. 




*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*

Comments