दैनिक राशिभविष्य
सोमवार, २४ जून २०२४.
ज्येष्ठ कृष्ण द्वितीया. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - उ.षा . आज जन्मलेल्या बाळाची राशी - मकर.
"आज दुपारी १२.०० पर्यंत चांगला दिवस आहे."
मेष:- चंद्र गुरू शुभ योग आहे. सुरुवात चांगली होणार आहे. आज महत्त्वाची कामे पूर्ण करा. कुटुंबास वेळ द्याल.
वृषभ:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. एखादा सुखद अनुभव येऊ शकतो. प्रवास घडतील.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. चांगले आर्थिक लाभ होतील. वाहन जपून चालवा.
कर्क:- दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभ वाढतील. पत्नीची काळजी घ्या.
सिंह:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या:- संमिश्र दिवस आहे. मनाप्रमाणे काही घटना घडतील. संतती शी संवाद साधा. प्रवासात त्रास संभवतो.
तुळ:- सौख्य देणारा दिवस आहे. मन आनंदी राहील. भौतिक सुखे मिळतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल.
वृश्चिक:-अनुकूल दिवस आहे. व्यवसाय वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. मात्र नोकरीत अपेक्षाभंग होऊ शकतो.
धनु:- अनुकल ग्रहमान आहे. आध्यत्मिक अनुभव येतील. उमेद वाढवणारा दिवस आहे. प्रतिष्ठा जपावी लागेल.
मकर:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. आनंदात दिवस व्यतीत होईल. आयुष्यत काही मोठे बदल घडतील.
कुंभ:- प्रतिकूल दिवस आहे. कामे रेंगाळतील. संतती ची काळजी वाटेल. मौल्यवान वस्तूची काळजी घ्या.
मीन:- अनुकूल लाभ स्थानी चंद्र आहे. मोठी कामे आज पार पडतील. धैर्य दाखवाल. धाडसी निर्णय घ्याल.
Comments
Post a Comment