राजर्षी शाहू प्रतिमेचे कलायोगी जी कांबळे आर्ट गॅलरीत पूजन
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
मिरजकर तिकटी येथे कलायोगी जी कांबळे आर्ट गॅलरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० वी जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारत सरकार पोस्ट तिकीट ही मूळ प्रत प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नगरसेवक आर .डी. पाटील , आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे तसेच दीपा अतीग्रे तसेच दूरदर्शन मालिकेतील आणि चित्रपटातील सहकलाकार प्रणोती कुमठेकर मॅडम यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात आर्ट गॅलरीचे अध्यक्ष श्री शांताराम उर्फ बबन कांबळे व प्रकाश पेंटर, दिलीप कांबळे , चित्रकार अरुण सुतार, विठ्ठल मंदिराचे पुजारी श्री मोहन जोशी, वैभव जाधव ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश साबळे, श्री पुरुषोत्तम कालेकर ,प्रकाश शिंदे, उदय जोशी , कु आर्य कांबळे ,वसंतराव पोतदार (बुवा)आणि भागातील नागरिक उपस्थित होते.यावेळी लोकराजा राजर्षि यांच्या विविध कार्यकर्तुत्वाला कार्याला अभिवादन करत आगामी काळात शालेय विद्यार्थ्यांना जी कांबळे आर्ट गॅलरीतील लोक राजा राजश्री चित्रकला गुरुजी दाखवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले .
Comments
Post a Comment