लोकराजा राजर्षि शाहू जयंती निमित्त सलग १५ व्या वर्षी कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर वतीने रक्तदान शिबीर संपन्न
लोकराजा राजर्षि शाहू जयंती निमित्त सलग १५ व्या वर्षी कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर वतीने रक्तदान शिबीर संपन्न : विक्रमी 110 रक्तदात्यांचा सहभाग
कोल्हापूर २६ सिटी न्यूज नेटवर्क
लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ कोल्हापूर दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सलग १५ व्या वर्षी या शिबीरात संस्थेचे सभासद, त्यांचे कर्मचारी आणि मार्केटिंग रेप्रेझेंटेटिव्ह यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे यावर्षी 110 रक्तदात्या नी विक्रमी संख्येने रक्तदान केले .
राजाराम पूरी कोरगांवकर हॉल मध्ये आज सकाळी प्रदीप जगताप - संजय मोहिते यांनी दिप प्रज्वलन करून या शिबीराचा प्रारंभ केला . अर्पण ब्लड बँकेच्या वतीने हे रक्त संकलन करण्यात आले सामाजिक जाणिवेतून सभासदांनी केलेल्या रक्तदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. या विक्रमी संख्येने सहभागी झालेल्या रक्त दान शिबीराच्या यशस्वितेसाठी अध्यक्ष मोहन पाटील - उपाध्यक्ष दिपक पाटील सह मंजूर अहमद शेख , अनिल सौंदलगेकर , प्रकाश पुणेकर , हितेन पटेल , गोपाळ कणसे , वैभव चिमटे , अरुण मागणांवे , श्रेणिक बिंदगे , कैलास शहा , प्रसाद स्वार , इलियाज वस्ताद या संस्थेचे पदाधिकारी - संचालक वर्गासह सभासदानी विशेष परिश्रम घेतले .
Comments
Post a Comment