दैनिक राशिभविष्य
रविवार, ३० जून २०२४
. ज्येष्ठ कृष्ण नवमी/दशमी. वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००
"आज चांगला दिवस आहे" घबाड दुपारी १२.२० नंतर.
चंद्रनक्षत्र - रेवती/अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन/ (सकाळी ७.३४ नंतर) मेष.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. आनंदाला उधाण येईल. अनुकूल घटना घडतील. मौज कराल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) उपासना करा. दानधर्म करा. आज खर्च वाढतील. आत्मविश्वस कमी होऊ शकतो. आर्थिक नियोजन करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल चंद्र आहे. मन उत्साही राहील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज अधिक काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. जेष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामानिमित्त बाहेर गावी जावे लागू शकते. मन प्रसन्न राहील तीर्थयात्रा घडेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. फारशी अनुकूलता नाही. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. संयम ठेवा.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्तम स्थानी चंद्र आहे. बरेच दिवस वाट बघितली ती व्यावसायिक संधी आज चालून येईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. नोकरी इच्छुकांना चांगली बातमी येऊ शकते. मेहनत वाढवावी लागेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पंचम चंद्र तुम्हाला प्रेरणा देईल. नवीन ज्ञान मिळेल. गूढ उलगडतील. नातेवाईक भेटतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राहत्या जागेजवळ भाग्योदय होईल. शेतीतून उत्पन्न मिळेल. नवीन ओळखी होतील. राजकीय यश प्राप्त होईल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. भावंड भेटतील. नात्यातून लाभ होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) धनप्राप्ती होईल मात्र खर्च देखील वाढेल. छोटी सहल घडेल. आर्थिक चिंता वाढेल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
३० जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात. उत्साह भरपूरआहे. प्रवासाची आवड आहे. वडिलो पार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. मुलांवर विशेष प्रेम असते. आपल्याला अज्ञात शक्ती लाभ व्हावेत आणि इतरांना आपण मदत करावी असे तुम्हाला नेहमी वाटते. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहेत. आयुष्यत तुम्हाला उशिराने प्रसिद्धी मिळते. तुम्हाला शुद्ध प्रेम आवडते, तुम्ही न्यायी आहात. मोठ्याने बोलण्याची सवय आहे. तुम्ही अभ्यासू आहात व त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा करतात मात्र धर्माबद्दल तुम्हाला अभिमान आहे. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुमचे बुद्धिकौशल्य तुम्ही कृतीमध्ये उतरवतात. इतरांसाठी कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकाराची हौस आहे. गूढ विद्यांची आवड आहे. विशेषत: तत्वज्ञान तुमच्या आवडीचा विषय आहे. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. इतरांना तुमचा सहवास आवडतो. तुम्ही आशावादी आहात. तुम्ही काळजीपूर्वक पावले टाकतात. शैक्षणिक क्षेत्र किंवा व्यवस्थापकीय क्षेत्र यात तुम्ही चमक दाखवतात. तुम्ही शांत आणि प्रामाणिक आहात. कृतिशील असलात तरी मनातून अस्वस्थ असतात. तुमच्यात महत्वकांक्षा आणि अभिमान आहे. धर्मादाय संस्था, मुकबधीर संस्था यांसाठी विनामोबदला काम करण्याची आवड असते. वयाच्या तीस यानंतर भाग्योदय होतो. तुम्ही समाजप्रिय असून तुम्हाला नाटक, सिनेमा, क्लब इत्यादींची आवड असते. कला आणि संगीतयांची आवड असून गृह सजावट करणे आवडते.
व्यवसाय:- राजकीय क्षेत्र, न्यायाधीश, डॉक्टर, केमिस्ट, शिक्षक, लेखक, सचिव.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, लसण्या, अमेथिस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment