दैनिक राशिभविष्य
शुक्रवार, २८ जून २०२४.
ज्येष्ठ कृष्ण सप्तमी/अष्टमी. वर्षा ऋतू, क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज उत्तम दिवस आहे.
चंद्रनक्षत्र - पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानातील चंद्राचा गुरू अन हर्षल शी शुभ योग आहे. योग्य कारणांसाठी खर्च होईल. आध्यत्मिक लाभ होतील.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सर्व कामे यशस्वी होतील. नवीन वस्तूची खरेदी होईल. आशा आकांक्षा पूर्ण होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल संभवतात. बौद्धिक क्षमता वापरून तुम्ही अडचणींवर मात करू शकतात. अधिकार वाढतील.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)अनुकूल ग्रहमान धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जेष्ठची पसंती लाभेल. दूरचे प्रवास घडतील.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. घरातील जेष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल. कामानिमित्त भटकंती होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. वाहन सुख लाभेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. चोरीचे भय आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा पणास लागेल. त्यासाठी खर्च कराल. आरोग्य सांभाळा.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ बाबींचे आकर्षण वाटेल. कोणताही जुगार खेळू नका. संततीची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकारी मदत करतील. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रह योग सौख्य प्रदान करेन. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. लाभ होतील.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय स्थानी चंद्र आहे. स्थवर संपत्तीचे प्रश्न सुटतील. खनिज कामातून लाभ होतील. पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. चिंता कमी होतील. मोठे करार होतील.
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
२८ जून रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवि, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वप्नांळू असून सामाजिक संस्थांशी तुमचा संबंध येतो. तुमच्या भावना तुम्हाला सहजपणे व्यक्त करता येत नाहीत. कौटुंबिक जीवनात अनपेक्षित बदल घडतात. तुमचा जन्म प्रतिष्ठित आणि श्रीमंत घराण्यात होतो. एकाग्रता कमी असल्याने शिक्षणात खंड पडू शकतो. मात्र तुमचा स्वभाव संशोधन करण्याचा आहे. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला शास्त्राची आवड आहे. तुम्ही आक्रमक आणि तापट आहात. अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांची लुडबुड तुम्हाला सहन होत नाही. तुमची वृत्ती व्यापारी आहे आणि तुम्ही झटपट काम करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. खेळण्याची हौस आहे. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगण्याची तुम्हाला आवड आहे. तुम्ही जे कार्य हातात घेतात त्यात तुम्हाला यश मिळते कारण तुमचे नियोजन चांगले असते. तुम्हाला गूढ विद्यांची देखील आवड आहे. तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. सौंदर्याबद्दल तुम्हाला नैसर्गिक आकर्षण आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही गर्दीमध्ये लोकप्रिय असतात. नीती आणि आणि अनीती याबद्दल तुमच्या कल्पना जरा वेगळ्या आहेत. तुम्ही सतत उद्योग मग्न असतात. उद्योग प्रिय आहात. तुम्ही कायम उत्साह मूर्ती असतात. इतरांचा तुम्ही आदर करतात. इतरांना तुम्ही तणावापासून मुक्त करतात. तुम्ही फार सखोल अभ्यास करणारे जरी नसले तरी तुमचे वक्तृत्व चांगले असते. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुम्ही संशोधक असाल आणि त्याचा जगाला कसा फायदा होईल याचा विचार करतात. तुम्ही जसे व्यवहारी आहात तसे दानधर्म करणारे देखील आहात.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, चित्रपट निर्माते, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर, दिग्दर्शक, बँकिंग, औषधाचे दुकान, वैद्यकीय क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक्स, वकिली.
शुभ दिवस: सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, हिरवा.
शुभ रत्न:- पाचू, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली ê करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
Comments
Post a Comment