जीओकडून नवीन एअरफायबर वापरकर्त्यांसाठी 1000 रुपयांचे इन्स्टॉलेशन शुल्क माफ

 जीओकडून  नवीन एअरफायबर वापरकर्त्यांसाठी 1000 रुपयांचे इन्स्टॉलेशन शुल्क माफ



30% सवलतीसह फ्रीडम ऑफरची घोषणा

कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

जिओफायबर / एअरफायबर ही देशातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी होम ब्रॉडबँड आणि मनोरंजन सेवा आहे.

1.2 कोटी घरांसह, जिओफायबर / एअरफायबर 99.99% सेवा उत्कृष्टतेसह वेगाने वाढत आहे. भारतीय घरांचे डिजिटलायझेशन आणि भारताला डिजिटल समाजात रूपांतरित करण्याच्या या गतीला पुढे नेण्यासाठी, जिओ एअरफायबर योजनांवर अतिरिक्त 30% सूट देत आहे. हि ऑफर अधिकाधिक कुटुंबांना जोडण्यासाठी प्रोत्साहित करेल.


या फ्रीडम ऑफरद्वारे, नवीन जिओफायबर वापरकर्त्यांना रु. 1,000 चे इन्स्टॉलेशन शुल्क माफ करून नवीन कनेक्शनवर 30% सूट मिळेल. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि 26 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान वैध असेल .


नवीन एअरफायबर कनेक्शनसाठी 60008-60008 वर मिस्ड कॉल द्या.

Comments