मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळावी व प्रशासनाने संभ्रमावस्था दूर करावी : कोल्हापूर शहर सुधारणा समितीची प्रशासनाकडे केली मागणी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ मिळावी व प्रशासनाने संभ्रमावस्था दूर करावी : कोल्हापूर शहर सुधारणा समितीची प्रशासनाकडे केली मागणी
कोल्हापूर २ सिटी न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मुदतवाढ मिळावी व प्रशासनाने संभ्रमावस्था दूर करावी अश्या मागणीचे निवेदन कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केलेल्या मागण्या
१) योजनेसाठी अर्ज करणेची मुदत १ जुलै ते १५ जुलै असून लागणारी कागदपत्रे पाहिली तर योजनेस किमान आणखी १५ दिवस मुदतवाढ मिळावी.
२) योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, जन्म दाखला त्वरीत मिळणेसाठी महा ई सेवा केंद्राची संख्या वाढवावी व हे दाखले मोफत द्यावेत अथवा दरनिश्चिती सवलतीच्या दरात करुन या संदर्भात जादा आकारणी करु नये साठी तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जाहीर करावा.
३) योजना यशस्वी करणेसठी विविध ठिकाणी मार्गदर्शन शिबीरे घेऊन एकाच ठिकाणी सर्व दाखले वअर्ज दाखल करुन घ्यावेत.
४) महिलांची विवाह नोंदणी व नावात बदल यासाठी आधारकार्ड अथवा पॅनकार्ड ग्राह्य धरावे, गॅझेटची सक्ती करु नये.
५) कोल्हापूर जिल्ह्यात महापुरात अनेक महिलांची कागदपत्रे गहाळ झालेने कोल्हापूरसाठी वेगळी नियमावली जाहीर करावी.
६) सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बहिणींसाठी जाहीर केलेली ही योजना यशस्वी करणेसाठी प्रशासनाने जनसहभाग घेऊन कोल्हापूर शहरात शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचवावी.
यावेळी शहर सुधारणा समितीचे निमंत्रक किशोर घाटगे, मनोहर सोरप, संचीता शिंदे , प्रकाश घाटगे, नंदू घोरपडे, शिला माने, संदीप घाटगे , अवधूत भाटे, गौरव लांडगे आदी उपस्थित होते.
![]() |
जाहिरात |
Comments
Post a Comment