शिवाजी पेठ परिसरात आदर्श प्रशालेच्या वतीने मतदान जनजागृत प्रबोधन मिरवणूक - सोमवारी सामुदायिक शपथ

 शिवाजी पेठ परिसरात आदर्श प्रशालेच्या वतीने मतदान जनजागृत प्रबोधन मिरवणूक  - सोमवारी सामुदायिक शपथ



    कोल्हापूर  १६ सिटी न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत शंभर  टक्के मतदान व्हावे यासाठी सरनाईक कॉलनीतील आदर्श प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थी - शिक्षकांच्या सहभागाने शिवाजी पेठ जुना वाशी नाका परिसरात भव्य प्रबोधन रॅली काढण्यात आली .                       ' आमच्या उज्वल भवितेसाठी सर्वांनी मतदान करा ' ' मतदान ही एक संधी आहे योग्य उमेदवार निवडण्याची हीच एक संधी आहे ' माझा अभिमान माझा मतदान '  मतदार राजा जागा हो - निवडणुकीचा धागा व्हावा अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी ह्या सर्व सर्व मतदार आणि नागरिकांचे लक्षवेधून घेतले .       

                          मुख्याध्यापक श्री आर. वाय. पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री आर बी. माने श्री ए  .के .देसाई  सौ एस .एस .शिंदे यांच्यासह आरोग्य पत्रकार राजेंद्र मकोटे सहभागी झाले होते . येत्या सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आदर्श प्रशाला - स्थानिक दत्त तरुण मंडळ आणि पालक परिसरातील नागरिक तरुण मंडळ यांच्या सहभागाने शंभर टक्के मतदान करण्याची सामुदायिक शपथ घेतली जाणार आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याध्यापक आदर्श प्रशाला आणि दत्त तरुण मंडळ अध्यक्ष राजू सावंत -धनजय नामजोशी-  -समन्वयक  राजेंद्र मकोटे आणि मँगो एफ एम( 90.4 ) यांच्या वतीने करण्यात आले आहे ..

Comments

Post a Comment