पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन
कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क
राधागरी धरणाची दोन दरवाजे बंद झाले असली तरीही पावसाची असलेल्या सातत्यामुळे कोल्हापूर शहरात पूरग्रस्त भागामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे .दसरा चौकातून विनस कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिपडे सराफ च्या आणि सुतारमळ्या समोरच्या भागात पाणी आलेली आहे यासह दसरा चौकातून शहाजी कॉलेज क्लब मार्गे बावड्या कडे जाणाऱ्या रोडवर असणाऱ्या पुलावर पाणी आल्याने तो हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत
खालील घर पंपाजवळ पाण्यात गती असल्याने आणि पाण्याची खोली ही जास्त असल्याने या ठिकाणी कोणीही वाहने घेऊन जाऊ नये असे आव्हाने पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे याच बरोबरीने बसून बार टॉकीज समोर ते पेंढारकर कलादालन महावीर गार्डनच्या मागे असणाऱ्या रोडवरही पाणी आलेला आहे या ठिकाणी पाणी ची उंची कमी असली तरी पुराच्या पाण्याबरोबरच चिकट माती आणि दलदल ही रस्त्यावर आलेली आहे त्यामुळे या ठिकाणाहून दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत तरी हे नाहकधाडस कोणी करू नये .पर्यायी रत्याचा वापर करावा .
Comments
Post a Comment