जिल्हाधिकारी आदेशाप्रमाणे शाळा बंद चे आवाहन असताना कोल्हापूर रिंग रोड फुलेवाडी येथील एक शाळा चालू होती
जिल्हाधिकारी आदेशाप्रमाणे शाळा बंद चे आवाहन असताना कोल्हापूर रिंग रोड फुलेवाडी येथील एक शाळा चालू होती..
![]() |
प्रातिनिधिक |
कोल्हापूर, दि. २९ सिटी न्यूज नेटवर्क
उपविभागिय अधिकारी, करवीर यांनी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यात पुरस्थिती असल्यामुळे व ब-याच मार्गावर पाणी असल्यामुळे व वाहतूक बंद असल्यामुळे दिनांक २९ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवणे उचित होईल असे कळवण्यात आले होते..
त्यामुळे अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोल्हापूर, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारान्वये जिल्हयातील करवीर तालुक्यामधील कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रासह सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली असताना सदरच्या आदेशाचे पालन न करता रिंग रोड फुलेवाडी येथील मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल यांनी आपली शाळा चालू ठेवली होती.
यामुळे त्याच भागातील इतर शाळा कॉलेज यांनी सरकारी आदेश चे पालन केले असता स्कूलच्या व्यवस्थापकांना पालकांनी त्यांची शाळा चालू आहे आपली का शाळा चालू नाही असा प्रश्न विचारण्यात आला. हे कितपत योग्य आहे. सरकारी आदेशाचे पालन करायचे का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जे सरकारी आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी इतर शाळा कॉलेज व्यवस्थापक्याकडून मागणी होत आहे. आम्ही सरकारी आदेशाचे पालन केले यात आमची चूक आहे का?असे माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले. सरकारी आदेशाचे जे कोणी पालन करणार नाही त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
Comments
Post a Comment