रेसिडेन्सी क्लब पुरस्कृत जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य; प्रणव पाटील उपविजेता तर आदित्य सावळकर तृतीय स्थानी
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूर ने जागतिक बुद्धिबळ दिन महोत्सवाअंतर्गत रेसिडेन्सी क्लब, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा निवड व अजिंक्य बुद्धिबळ मोठ्या उत्साहात पार पडल्या..या स्पर्धा रेसिडेन्सी क्लब ने पुरस्कृत केल्या होत्या..
आज झालेल्या अंतिम सातव्या फेरीनंतर सहा गुणासह आघाडीवर असलेल्या सोहम खासबारदार ने अंतिम,सातव्या फेरीत पहिल्या पटावर माधव देवस्थळी विरुद्ध कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून साडेसहा गुणासह निर्विवादपणे अजिंक्यपद पटकावले.सोहमला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या पटावर अग्रमानांकित आदित्य सावळकरने अपेक्षेप्रमाणे अर्णव पोर्लेकरचा पराभव केला. तिसऱ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकमने कोल्हापूरच्या अंशुल चुयेकर वर सहज मात केली.चौथ्या पटावर चौथा मानांकित प्रणव पाटील ने प्रशांत जाधवना नमविले तर पाचव्या पटावर कागलच्या स्वरूप जोशीने कोल्हापूरच्या आरव पाटील वर विजय मिळवला..प्रणव पाटील, आदित्य सावळकर रवींद्र निकम व स्वरुप जोशी या चौघांचे समान सहा गुण झाले होते.सरस बखोल्झ टायब्रेक 26 गुणानुसार प्रणव पाटील उपविजेता ठरला..तर अग्रमानांकित आदित्य सावळकर द्वितीय मानांकित रवींद्र निकम इचलकरंजी व नववा मानांकित स्वरूप जोशी कागल यांना अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.उपविजेत्या प्रणव पाटील ला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.अग्रमानांकित आदित्य सावळकर ला तिसऱ्या क्रमांकाचे रोख दीड हजार रुपये व चषक देऊन गौरविले.द्वितीय मानांकित रवींद्र निकमला चौथ्या क्रमांकाचे रोख एक हजार रुपये देऊन सन्मानित केले तर कागलच्या स्वरूप जोशीने पाचव्या क्रमांकाचे रोख 700/- रुपयाचे बक्षीस मिळविले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ रेसिडेन्सी क्लबचे सचिव अमर गांधी सहसचिव शितल भोसले व खजिनदार नरेश चंदवाणी चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,उपाध्यक्ष धीरज वैद्य, सचिव मनिष मारुलकर, उत्कर्ष लोमटे,अनिश गांधी,आरती मोदी व अभिजीत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त , खेळाडूच्या वतीने ज्येष्ठ प्रशिक्षक भरत चौगुले,उत्कर्ष लोमटे, मनिष मारुलकर व माधव देवस्थळी या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला.
सोहम खासबारदार, प्रणव पाटील, आदित्य सावळकर व रवींद्र निकम या चौघांची निवड जळगाव येथे दिनांक २५ जुलै ते 28 जुलै दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
अन्य बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट 6)) विवान सोनी इचलकरंजी 7) प्रणव मोरे कोल्हापूर 8) आरव पाटील कोल्हापूर 9) रवी आंबेकर कोल्हापूर 10) गौरंग गेरेला कोल्हापूर 11) रिशित पाटील कोल्हापूर
उत्तेजनार्थ बक्षीस
*साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू*
1) माधव देवस्थळी कोल्हापूर 2) रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर
*उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू*
1)सृष्टी जोशीराव प्रायव्हेट हायस्कूल 2)सृष्टी कुलकर्णी कोल्हापूर 3)अरिना मोदी पोदार इंटरनॅशनल स्कूल 4)व्रिधी गायकवाड विद्यानिकेतन 5) स्नेहल गावडे प्रायव्हेट हायस्कूल
*उत्कृष्ट ग्रामीण बुद्धिबळपटू*
1) ओम भेंडे संजय घोडावत स्कूल 2) श्रीयांस हराडे सर्वोदय जीवन गडहिंग्लज 3) श्रेयस पाटील सर्वोदय जीवन गडहिंग्लज 4) आर्यन पाटील सर्वोदय जीवन गडहिंग्लज 5) आराध्य दिंडे आदर्श गुरुकुल पेठ वडगाव
*पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1) शार्दुल जौजाळ न्यू मॉडेल स्कूल 2) जय भेंडे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल 3) शिवराज भोसले अल्फोसो स्कूल 4)आर्यन पाटील न्यू मॉडेल स्कूल 5) आदिराज पाटील सेव्हनथ् डेज
*तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1) अंशुल चुयेकर सेंट झेवियर्स स्कूल 2) अनुज खोत माईसाहेब बावडेकर 3) अर्णव माने संजय घोडावत इंटरनॅशनल 4) सार्थक जाधव माईसाहेब बावडेकर 5) योगद्रुम माने संजय घोडावत इंटरनॅशनल
*अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1)अर्णव पोर्लेकर न्यू हायस्कुल 2)अखिलेश जावळे शाहु विद्यालय 3)श्रीराज देसाई नेहरु नगर विद्यामंदिर 4)शर्मन सामंत विब्गोर 5) शुभान भोकरे संजय घोडावत इंटरनॅशनल
*नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1) अवनीश जितकर पी आर मुंडर्गी इंग्लिश स्कूल 2) विहान हर्डीकर पी आर मुंडर्गी स्कूल 3) वन्सिल ठक्कर विद्यानिकेतन 4) अद्वैत पाटील पोदार इंटरनॅशनल स्कूल 5) रुद्रवीर पाटील छत्रपती शिवाजी स्कूल गडहिंग्लज
*सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू*
1) आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे वारणानगर 2) अद्वैत कुलकर्णी पोदार इंटरनॅशनल स्कूल 3) नीलमाधव पिलाई विब्गोर 4) वृषांक माने राधाबाई शिंदे स्कूल 5)मिनाक्षी पिलाई विब्गोर
*उत्कृष्ट शाळा*
1) आदर्श गुरुकुल पेठ वडगाव 2) न्यू मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूल 3) शांतिनिकेतन स्कूल
Comments
Post a Comment