शहीद महाविद्यालयात 'बाबू'च्या अंकित मोहन, स्मिता तांबे यांची धमाल
कोल्हापूर (तिटवे) २३ सिटी न्यूज नेटवर्क
मयूर शिंदे दिग्दर्शित 'बाबू' चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून अंकित मोहन, नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे प्रमोशन शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये करण्यात आले. या सोहळ्यात अंकित मोहनने जबरदस्त एन्ट्री करत टायटल साँगवर धमाकेदार परफॅार्मन्स सादर केला. टाळ्या, शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थितांनीही त्याला उत्स्फूर्त साथ दिली.
अभिनेत्री स्मिता तांबे हिनंही सर्वांचं लक्ष वेधलं, विद्यार्थिनींशी संवाद साधला. बाबू सिनेमातील गाण्यांवर ठेका धरला. सध्या जोरदार चर्चा सुरू असलेला या चित्रपटामधील कलाकार अंकित मोहन, स्मिता तांबे दिग्दर्शक मयूर शिंदे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. सागर शेटगे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन मास मीडिया विभागाने केले होते. सूत्रसंचालन तेजस्विनी परबकर यांनी केले तर आभार प्रा. दिग्विजय कुंभार यांनी मानले.
Comments
Post a Comment