शालेय पोषण आहार बचत गटांकडून 'आप'ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार

 शालेय पोषण आहार बचत गटांकडून 'आप'ला देणगी; लढा यशस्वी केल्याबद्दल संदीप देसाईंचा सत्कार 


कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क 

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पोषण आहार पुरवणाऱ्या बचत गटांतर्फे आज आप पदाधिकाऱ्यांचा सत्कार पार पडला. सेंट्रल किचन पद्धतीमुळे छोट्या बचत गटांचे काम जाणार होते. आप ने याविरोधात चार वर्षे सातत्याने दिलेल्या लढ्यास यश येऊन 34 बचत गटांना पोषण आहाराचे काम मिळाले. 


हा लढा यशस्वी केल्याबद्दल महिला बचत गटांकडून आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक होते. 


सर्वासामान्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनेला बळ मिळावे या भूमिकेतून आप ला देणगी म्हणून एकवीस हजार रुपयांचा निधी पक्षाकडे सुपूर्द केला.


अभ्यासपूर्ण मांडणी आणि एखादा प्रश्न हातात घेतला की तो तडीस न्यायचा अशी कार्यपद्धती जोपसल्याने शहरातील अनेक प्रश्न सोडवण्यात आप यशस्वी ठरत असल्याचे गौरव उद्गार मुळीक यांनी काढले.


या प्रसंगी उषाताई वडर, समीर लतिफ, दुष्यंत माने, आदम शेख, राकेश गायकवाड, संजय नलवडे यांचेही सत्कार करण्यात आले.


यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, मराठा महासंघाचे प्रताप नाईक, महासचिव अभिजित कांबळे महिला बचत गटाच्या अश्विनी साळोखे, छाया जाधव, स्नेहल रायकर, सुनीता तांदळे, वैशाली सोनवणे, सुरेखा सोनवणे, अशा सोनवणे, जयश्री कदम, सुनीता मोहिते, कल्पना माने, मनीषा बामणे, पल्लवी पंडे आदी उपस्थित होते.

Comments