प्रभाकर शंकर चौगले पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ज्युनियर(19 वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर व दिशा पाटील अजिंक्य ; आदित्य सावळकर व दिव्या पाटील उपविजेते

 प्रभाकर शंकर चौगले पुरस्कृत कोल्हापूर जिल्हा ज्युनियर(19 वर्षाखालील) निवड बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर व दिशा पाटील अजिंक्य ; आदित्य सावळकर व दिव्या पाटील उपविजेते

कोल्हापूर जिल्हा ज्युनियर (19 वर्षाखालील) निवड झालेले बुद्धिबळपटू खाली बसलेले डावीकडून शर्वरी कबनूरकर, सिद्धी कर्वे, दिव्या पाटील, सिद्धी बुबणे, दिशा पाटील, शौर्य बगाडिया, आदित्य सावळकर, वरद आठल्ये व ऋषिकेश कबनूरकर
*पाठीमागे उभा असलेले सर्व मान्यवर पाहुणे, पंच व संयोजक..*


कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

 बालकृष्ण हवेली मंदिर,नागाळा पार्क, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर च्या मान्यतेने अनयाज् चेस क्लब ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा ज्युनिअर (19 वर्षाखालील) मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या.

मुलांच्या गटात अंतिम सहाव्या फेरीमध्ये अग्रमानांकित कोल्हापूरच्या आदित्य सावळकरला द्वितीय मानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकर ने पराभूत करून सहापैकी सहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले.आदित्य सावळकर,वरद आठल्ये कोल्हापूर व शौर्य बगाडिया इचलकरंजी या तिघांचे समान पाच गुण झाले होते. बखोल्झ टायब्रेक गुणानुसार पाच गुणासह आदित्य सावळकर ला उपविजेतेपद मिळाले..तर वरद आठल्येला तिसरा क्रमांक तर शौर्य बगडियाला चौथा क्रमांक मिळाला.मुलींच्या गटात अंतिम पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित दिव्या पाटील व द्वितीय मानकित दिशा पाटील या जयसिंगपूरच्या जुळ्या भगिनींनी पाच पैकी समान साडेचार गुण मिळवले. टायब्रेक गुणानुसार दिशा पाटील अजिंक्यपद मिळाले तर दिव्या पाटीलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.नांदणीच्या सिद्धी बुबणे ने चार गुणासह तृतीय स्थान मिळविले.कोल्हापूरची शर्वरी कबनूरकर तीन गुणासह चौथे स्थान प्राप्त केले.तर जयसिंगपूरच्या सिद्धी कर्वे ला तीन गुणासह पाचवे स्थान मिळाले.या सर्वांची निवड राज्य निवड स्पर्धेसाठी झाली आहे.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ शरद पाटील,  सुधीर देसाई मंडल अधिकारी भाजप कोल्हापूर,डॉक्टर दीपा पाटील व सौ.विनिता बलदवा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मनीष मारूलकर,धीरज वैद्य व आरती मोदी उपस्थित होते.

कोल्हापूर मध्ये पाच सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर (19 वर्षाखालील) निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा निवडण्यात आलेल्या संघ पुढीलप्रमाणे 

मुले :- 1) ऋषिकेश कबनूरकर 2) आदित्य सावळकर 3) वरद आठल्ये 4) शौर्य बगाडिया

मुली :- 1) दिशा पाटील 2) दिव्या पाटील 3) सिद्धी बुबणे 4) शर्वरी कबनूरकर 5) सिद्धी कर्वे

उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे

नऊ वर्षाखालील उत्कृष्ट

 मुले,:-1) ध्रुव भोसले सोनतळी 2) समरवीर संघवी कोल्हापूर

मुली :- काव्यांजली पडवळ गगनबावडा

अकरा खालील उत्कृष्ट 

मुले :- 1) विवान सोनी इचलकरंजी 2) हित बलदवा जयसिंगपूर

मुली :- 1) सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2) आर्या चोडणकर कोल्हापूर

तेरा वर्षाखालील उत्कृष्ट

1) मुले :- अभय भोसले जांभळी 2) राजदीप पाटील कोल्हापूर

मुली :- 1)सृष्टी जोशीराव कोल्हापूर 2)स्नेहल गावडे कोल्हापूर

पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट 

मुले :- 1) अरिन कुलकर्णी कोल्हापूर 2)प्रणव मोरे कोल्हापूर

मुली :- 1)आरुषी पाटील कोल्हापूर 2) व्रिधी गायकवाड कोल्हापूर

Comments