दैनिक राशिभविष्य
सोमवार, २६ ऑगस्ट २०२४.
श्रावण कृष्ण अष्टमी. वर्षा ऋतू. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
"आज दुपारी ४.०० नंतर चांगला दिवस आहे." *श्रीकृष्ण जयंती* काळाष्टमी.
चंद्र नक्षत्र - कृतिका/(दुपारी ३.५५ नंतर) रोहिणी. आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ. (व्याघात योग शांती करून घ्यावी)
मेष:- कौटुंबिक सुख मिळेल. मात्र त्यासाठी संततीशी सुसंवाद साधला पाहिजे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. राजकीय त्रास जाणवेल.
वृषभ:- सूर्याच्या नक्षत्रात चंद्र आहे. नेतृत्वगुण उफाळून येईन मात्र सामाजिक कार्यात झोकून देताना विचार करा. गुप्त शत्रू निर्माण होतात. अनुकूल नेपच्यून सुखाची बरसात करेन.
मिथुन:- व्यय स्थानी चंद्र आहे. तिसरा सूर्य आहे. आई वडिलांची सेवा करा. सौख्य मिळेल. तुम्ही पराक्रमी आहेत मात्र आज भलत्या जागी शौर्य दाखवू नये.
कर्क:- चंद्र अनुकूल आहे. त्याचा नेपच्यूनशी शुभ योग आहे. आनंददायक सहलीचा योग येईन. काव्य आणि विनोद यात रंगून जाल.
सिंह:- तुमचा राशीस्वामी तुमच्याच राशीत आहे. आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. आज तुम्ही खूप कष्ट कराल. तरीही वरिष्ठांची नाराजी राहू शकते.
कन्या:- राजकीय किंवा सरकारी कामांसाठी आज अनुकूल दिवस नाहीये. दिरंगाई अनुभवाल. खर्च वाढतील.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. सूर्य अनुकूल असले तरी चंद्राचा केंद्र योग आहे. मित्र मंडळी भेटतील. धनलाभ होईल. काही अपेक्षा अपूर्ण राहतील.
वृश्चिक:- नवनवीन ओळखी होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पत्नीसाठी वेळ द्याल. जे काही प्राप्त करायचे होते ते आज साध्य होईल.
धनु:- भांडण तंटे असल्यास मिटतील. आरोग्याबत सजग व्हाल. व्यायामाचे महत्व पटेल. आर्थिक लाभ होतील. अपेक्षा पूर्ण होतील.
मकर:- कितीही नियोजन केले तरी ते आज बदलणार आहे. मन अस्वस्थ ठेवणारा कालावधी आहे. सूर्य देवाची उपासना करा. दमा आणि खोकला यांचा त्रास होऊ शकतो.
कुंभ:- विनाकारण आळस आल्यासारखे वाटेल. घरगुती किंवा वाहन दुरुस्तीची कामे निघू शकतील. अडचणीतून मार्ग निघतील.
मीन:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. विरोधक पराभूत होतील. यशश्री प्राप्त होईल. मौज कराल. व्यसने टाळा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
Comments
Post a Comment